निर्भया प्रकरणातील दोषींच्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज सुनावणी

22 जानेवारीला फाशीची शिक्षा 

Updated: Jan 14, 2020, 08:07 AM IST
निर्भया प्रकरणातील दोषींच्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज सुनावणी  title=

नवी दिल्ली : निर्भयाच्या आरोपींची क्युरेटिव्ह याचिका आज सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. निर्भया प्रकरणात चार आरोपींपैकी दोन आरोपींनी याचिका दाखल केली होती. याचिकेची सुनावणी मोकळ्या न्यायलयात न होता न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये होणार आहे. ही सुनावणी आज दुपारी 2 वाजता होणार आहे. 

न्या. रमन्ना, न्या. अरुण मिश्रा, न्या. नरीमन, न्या. भानुमती आणि न्या. अशोक भूषण यांचं पीठ क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी करणार आहे. एखाद्या दोषीची राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलेली द्या याचिका आणि सर्वोच्च न्यायालयात पाठवण्यात आलेली पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली तर दोषी व्यक्ती क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करू शकतात.

न्यायमूर्ती भानुमती आणि न्यायमूर्ती भूषण यंच्या बेंचने आरोपींची पुनर्विचार याचिका 18 डिसेंबर रोजी फेटाळली होती. ज्यानंतर पटियाला हाऊसच्या ट्रायल कोर्टाने चारही आरोपींना 22 जानेवारी रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे वॉरंट निर्भयाच्या आईच्या तक्रारीवर दाखल केलं होतं. (निर्भया हत्या : दोषी मुकेशची आईनं घेतली भेट) 

 

दोषींच्या कुटुंबीयांना त्यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात येतेय. तिहार तुरुंगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोषी मुकेश याच्या आईनंही तुरुंगात आपल्या मुलाची भेट घेतली. सध्या ही परवानगी सर्वच दोषींना देण्यात आलीय. उल्लेखनीय म्हणजे, दोषी मुकेश याच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही दोषीचं कुटुंब त्यांची भेट घेण्यासाठी तुरुंगात आलेलं नाही. 

तिहार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टाकडून डेथ वॉरंट जारी केलं गेल्यानंतर निर्भयाचे सर्व दोषींना वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलंय. तुरुंग प्रशासनानं उत्तरप्रदेशच्या दोन जल्लादांना पाचारण केलंय. यामध्ये एक पवन जल्लादचाही समावेश आहे. सर्व दोषींना सध्या साधं इतर दोषींना दिलं जाणारं जेवण दिलं जातंय. आपली संपत्ती कुणाच्या नावे करायची असल्यास सांगण्यासही दोषींना सांगण्यात आलंय. परंतु, अद्याप यावर कोणतंही उत्तर आलेलं नाही.