सर्वोच्च न्यायालयाकडून नीट परीक्षा रद्द करण्यास नकार

नीट परीक्षा रद्द केली जाणार नाही, असं झालं तर मेडिकल आणि डेंटल कोर्स ज्वाईन करण्यासाठी, ही टेस्ट पास करणाऱ्या ६ लाख विद्यार्थ्यांवर त्याचा प्रभाव पडणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 15, 2017, 11:53 AM IST
सर्वोच्च न्यायालयाकडून नीट परीक्षा रद्द करण्यास नकार title=

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल एलिजिबिलिटी-कम-एंट्रेंस टेस्ट २०१७ ची परीक्षा रद्द करण्यास नकार दिला आहे.

टॉयने दिलेल्या बातमीनुसार, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय, 'नीट परीक्षा रद्द केली जाणार नाही, असं झालं तर मेडिकल आणि डेंटल कोर्स ज्वाईन करण्यासाठी, ही टेस्ट पास करणाऱ्या ६ लाख विद्यार्थ्यांवर त्याचा प्रभाव पडणार आहे'.

न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या ३ न्यायाधिशांच्या खंडपिठाने म्हटलं आहे, नीटच्या निकालाला डिस्टर्ब करणे खूप कठीण होऊ शकतं.

कारण ११ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांमधून, ६ लाख ११ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पास केली आहे आणि पुढे काऊन्सलिंग प्रोसेसही सुरू आहे.