नवी दिल्ली : Hijab Controversy : कर्नाटकमधील हिजाब प्रकरणी ( Karnataka Hijab Controversy) सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. (Supreme Court has refused to hear the Hijab case of Karnataka)
हिजाब प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, योग्य वेळ आल्यावर या प्रकरणाची सुनावणी केली जाईल. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणी दुसऱ्यांदा सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, कर्नाटकात काय होत आहे ते पाहत आहोत? सर्वोच्च न्यायालयाने वकिलांना सांगितले की, हा राष्ट्रीय स्तराचा मुद्दा बनवू नका आणि योग्यवेळी त्यात हस्तक्षेप केला जाईल. हिजाबचा मुद्दा धार्मिक आणि राजकीय बनवू नका, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकतेच अंतरिम आदेश दिले होते की पुढील आदेश येईपर्यंत शाळा पुन्हा सुरु कराव्यात आणि तोपर्यंत शाळांमध्ये धार्मिक पोशाखावर बंदी घालावी.