नवी दिल्ली : देशभरात महिलांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींबाबत तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यातल्या अनेक तक्रारी या मी टू मोहिमेअंतर्गत करण्यात आल्या आहेत.
सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती एस. के. कौल यांच्या खंडपीठीने ही याचिका फेटाळली आहे. नियमीत यादीनुसारच या संदर्भात सुनावणी होईल असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
#MeToo चळवळीत तक्रारी दाखल कऱणाऱ्या महिलांना योग्य ती सुरक्षा मिळावी असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.