Sun Halo Photos in Prayagraj: आकाशात अनेक प्रकारची सुंदर आणि नयनरम्य दृश्यं (Sun Halo in India) आपल्यालाही पाहायला मिळतात. आपण ग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही परंतु सॉलार चष्मा लावून आपण हे दृश्य पाहू शकतो. असं दृश्य हे अत्यंत सुंदर आणि आपल्याला आनंद देणारं असतं. असंच काहीसं सुंदर दृश्यं हे प्रयागराजमध्ये पाहायला मिळालं आहे. गोल इंद्रधनुष्यात तळपता सुर्य घेरला होता. हे दृश्य पाहून तर पाहणारे फक्त पाहतच राहिले. या घटनेला सुर्य प्रभामंडळ म्हणजे सन हालो असं म्हणतात.
सूर्याच्या बाजूला इंद्रधनुष्य हे 22 डिग्रीच्या अंशात घेरते. या दुर्मिळ अशा खगोलीय घटनेसाठी (Rare Astronmical Events) लोकांनी अक्षरक्ष: रांग लावली होती. अनेकांनी हे क्षण कॅमेऱ्यातही कैद केले. सोशल मीडियावरही हे सर्व फोटो आणि व्हिडीओ हे इंटरनेटवर व्हायरल (Viral Sun Halo Photos) होताना दिसत आहेत. सध्या हे फोटोज पाहून तुम्हालाही अशा या सुंदर आणि दुर्मिळ खगोलीय घटनेचे दर्शन होईल. 28 एप्रिल म्हणजे काल भर उन्हात दुपारी हे दृश्य पाहायला मिळाले होते. (prayagraj photos goes viral on social media)
प्रभामंडळ एक प्रकारे प्रकाशाचं वलय असतं. प्रकाश पसरला की हे दृश्य पाहायला मिळते. आकाशात 20 हजाराच्या फूंटावर सिरस क्लाऊड असतो त्याच्यामुले हे गोलाकार बांगडीसारख्या आकाराचे प्रभामंडळ दिसू लागते. सिरस क्लाऊड म्हणजे काय तर हे आकाशातील ढग असतात ज्यात आर्द्रता असते त्यांचा थर हा अतिशय पातळ असतो. या ढगांमध्ये असणाऱ्या हेक्सागोनल बर्फाच्या क्रिस्टल्समच्या माध्यमातून सूर्य अथवा चंद्र ग्रहाची किरणं परावर्तित होतात आणि मग तयार होते हेलो ज्याला आपण प्रभामंडळ असतं म्हणतो.
360 rainbow in prayagraj pic.twitter.com/cIXgRkmHHF
— A (@misternomad) April 28, 2023
जिथं हवामान थंड आहे तिथं ही घटना पाहायला मिळते. त्यामुळे आपण अनेकदा (What Causes Sun Halo) असं पाहतो की अशा घटना हा परदेशातील थंड हवामान असलेल्या ठिकाणी पाहायला मिळतात. चक्रीवादळानंतरही असे ढग तयार होतात. त्यातून भारतातही अशा घटना घडल्या आहेत.
Nature is best Artist.
Mesmerizing sky in Prayagraj. pic.twitter.com/LMD3eukqEj
— Shivendra Pratap Singh (amrockz07) April 28, 2023
मागील वर्षी परभणीतही असं एक प्रभामंडळ पाहायला मिळाले होते. 2021 मध्ये बंगलोर आणि झाशीमध्येही असे दृश्यं हे पाहायला मिळाले होते. अनेक जण या घटनेवर नानाविध प्रश्नही विचारू लागले आहेत. नक्की ही घटना घडते कशी त्यातून याला कारणीभूत काय, वातावरण का त्यात होणारे बदल...सध्या ट्विटरवर हे फोटो जोरात व्हायरल होत आहेत.