कुत्रा चावल्यास दाताच्या प्रत्येक खूणेसाठी 10 हजार, तर मांस बाहेर आल्यास... हायकोर्टाचा मोठी निर्णय

देशात भटक्या कुत्र्यांची समस्या बिकट होत चालली असून कुत्र्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना गेल्या काही काळात समोर आल्या आहेत. यावर हायकोर्टाने आता महत्वाचा निर्णय दिला आहे. कुत्र्याच्या दाताच्या प्रत्येक दाताच्या खुणेसाठी 10 हजार रुपये तर मांस बाहेर आल्यावर सरकारला भरपाई द्यावी लागणार आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 14, 2023, 08:09 PM IST
कुत्रा चावल्यास दाताच्या प्रत्येक खूणेसाठी 10 हजार, तर मांस बाहेर आल्यास... हायकोर्टाचा मोठी निर्णय title=

Dog Bite Compensation : देशभरात भटक्या कुत्र्यांची (Stray Dog) समस्या बिकट बनली आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत किंवा जखमी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण यानंतरही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नाहीए. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी त्या त्या महापालिकांची (Municipal) असते. पण आजही भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यात महापालिकांना यश आलेलं नाही. श्वानांची नसबंदी हा तर केवळ फार्सच ठरत आहे. यादरम्यान हायकोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 

कुत्रा चावल्यास पीडित व्यक्तीला सरकारने 10 ते 20 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश हायकोर्टाने (High Court) दिले आहेत. एका प्रकरणाच्या सुनावणीत हरियाणा आणि पंजाब हायकोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. भटका कुत्रा चावल्यास दाताच्या प्रत्येक खुणेसाठी 10 हजार रुपये, तर शरीरावर जखमेचे व्रण किंवा 0.2 सेंटीमीर मांस जरी बाहेर आलं असेल तर किमान 20 हजार रुपेय भरवाई देण्यात यावी असं हायकोर्टाने म्हटलंय. 

भटके कुत्रे चावल्याच्या पंजाब, चंदीगड आणि हरियाणा भागातून तब्बल 193 याचिकांवर सुनावणी करताना हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. इतंकच नाही तर कुत्रे चावल्याच्या घटनांची नोंद करण्यासाठी एक समिती स्थापन करावे असे निर्देशही हायकोर्टाने राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांना दिले आहेत. भटके कुत्रे चावण्याच्या प्रकरणात प्रशासन जबाबदार असेल असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारने जबाबदारी घेत याप्रकरणी नियम बनवावेत असे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत. 

कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये वाढ
पंजाब, हरियाणा आणि चंदीगढमध्ये कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या पाच वर्षात कुत्रे चावण्याच्या तब्बल  6,50.,904 घटना घडल्या आहेत. यात 1,65,119 गंभीर जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

वाघ-बकरी चहाच्या सीईओंचा मृत्यू 
एक महिन्यापूर्वीच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वाघ बकरी चाहचे मालक पराग देसाई यांचा मृत्यू झाला. 15 ऑक्टोबरला पराग देसाई नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघाले होते, यावेळी त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात पराग देसाई रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांच्या मेंदूत रस्तस्त्राव झाला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

गाझीयाबादमध्ये एका लहान मुलाला भटका कुत्रा चावला. पण कुटुंबापासून त्याने ही गोष्ट लपवून ठेवी होती, काही दिवसांनी त्याला रेबिज झाला आणि वडिलांच्या मांडीवरच त्या मुलाचा तडफडून मृ्त्यू झाला. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीने जोर धरला होता.