Best Share Market Stocks to Buy: शेअर मार्केटवर आपण सगळे बोलू तेवढं कमीच आहे. सध्या शेअर मार्केटमध्ये (share market) काय काय चालू आहे? काय खाली आहे? काय वर चालू आहे? याची तपासणी करणं तसेच गुंतवणूक करण्यासाठी (Investment) अपडेट राहणं अत्यंत आवश्यक आहे. सध्या शेअर मार्केटमध्ये आपल्याला अनेक चढ उतार पाहायला मिळत आहेत. त्यातून अनेक शेअर घसरणीवर आहेत तर काही शेअर्स हे उच्चांक गाठत आहेत. सध्या ग्लोबल मार्केटमध्ये अनेक शेअर्स चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यातून जागतिक पातळीवरही काही प्रमाणात अस्थिरता असली तरी देशांतर्गत व्यापारपेठेत असे अनेक शेअर्स आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि 36 टक्क्यांपर्यंत चांगले रिटर्न्सही मिळवू शकता. ब्रोकरेज फर्म्सनी काही आकर्षक शेअर्सबद्दल सांगितले आहे. हे 5 शेअर्स तुम्ही चांगल्या तऱ्हेने विकत घेऊ शकता ज्यात तुम्हाला घसघशीत रिटर्न्स मिळू शकतील. चला तर मग जाणून घेऊया या पाच स्टॉक्सबद्दल. (stocks to buy these are the top 5 stocks that you can buy for good returns know more)
1. मॅरिको (Merico)
टार्गेट प्राईझ - 645 रुपये प्रति शेअर (शेअरखान)
6 डिसेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 501 रुपये होती.
परतावा - प्रति शेअर 144 रुपये ( 29 टक्के )
2. थर्ममॅक्स (Thermax)
टार्गेट प्राईझ - 2790 रुपये प्रति शेअर (शेअरखान)
6 डिसेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 2,050 रुपये होती.
परतावा - प्रति शेअर 740 रुपये ( 36 टक्के )
3. बाटा इंडिया (Bata India)
टार्गेट प्राईझ - 2055 रुपये प्रति शेअर (शेअरखान)
6 डिसेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 1,714 रुपये होती.
परतावा - प्रति शेअर 341 रुपये ( 20 टक्के )
4. वेदांता (Vendanta)
टार्गेट प्राईझ - 2055 रुपये प्रति शेअर (शेअरखान)
6 डिसेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 1,714 रुपये होती.
परतावा - प्रति शेअर 341 रुपये ( 20 टक्के )
5. आदित्या बिर्ला फॅशन (Aditya Birla Fashion)
टार्गेट प्राईझ - 374 रुपये प्रति शेअर (शेअरखान)
6 डिसेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 314 रुपये होती.
परतावा - प्रति शेअर 60 रुपये ( 19 टक्के )
कुठलेही स्टॉक्स खरेदी करताना स्वत:चा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यातून स्वत:हूनच संशोधन करा, कायम असा विचार करा उद्या तुम्हाला यातून कदाचित अपयश येईल. परंतु अशावेळी सकारात्मक रहा आणि संयम बाळगा. आणि विश्वास ठेवा की तुम्हाला यश नक्की मिळेल. त्यातून जर तुम्हाला शेअर मार्कट एकट्यानं कळत नसेल तर गुतंवणूक तज्ञांची आवर्जून मदत घ्या. शेअर मार्केटमध्ये अनेक अफवा फिरत असतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष देऊ नका आणि योग्य वेळी गुंतवणूक करा.
(Discialmer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)