मुंबई : शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यामध्ये काही पेनी स्टॉक देखील आहेत असाच एक स्टॉक म्हणजेच Flomic Global Logistics होय. दोन वर्षापूर्वी हा स्टॉक 35 पैसे इतका होता. आता हा स्टॉक 143 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. साधारण दोन वर्षांच्या कालावधीत हा स्टॉक 409 पटींनी वाढला आहे. दोन वर्षापूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक आता कोटींची झाली असती.
Flomic Global चा ग्राफ
28 मार्च 2019 ला BSE इंडेक्सवर स्टॉकची किंमत 0.35 रुपये होती. आता हा स्टॉक 143 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना साधारण 40,830 टक्क्यांचा रिटर्न मिळाला आहे. मागील सहा महिन्यात या शेअरची किंमत 7.62 रुपयांनी वाढून 143 पर्यंत पोहचली आहे.
तसेच वर्ष 2021 मध्ये स्टॉक 1.95 रुपयांच्या तुलनेत सध्या 143 रुपयांवर पोहचला आहे. कंपनीने आपल्या शेअर धारकांना साधारण 7245 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.
सहा महिन्यापूर्वी एखाद्या गुंतवणूकदारांने या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आता त्याचे 18.80 लाख झाले असते. एका वर्षापूर्वी गुंतवणूकदारांनी 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर आज 1.17 कोटी रुपये झाले असते