नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी खूशखबरी दिली आहे.
देशातील सर्वाम मोठ्या बँकेने फिक्स डिपॉजिटवर व्याजदरात वाढ केली आहे. आता फिक्स डिपॉझिटवर ०.५० टक्के व्याज जास्त मिळणार आहे.
बँकेने सिनिअर सिटीजन्ससाठी देखील व्याज दरात वाढ केली आहे,. ज्येष्ठ नागरिकांना आता ७ ते ४५ दिवसांच्या फिक्स डिपॉजिटवर ५.७५ टक्के व्याज मिळणार आहे. आधी व्याजदर ५,२५ टक्के होता.
१८० ते २१० दिवसांच्या डिपॉजिटवर एसबीआयने व्याजदर ६.७५ टक्क्यांवरुन ६.८५ टक्के केला आहे. २ ते ३ वर्षासाठी, ३ ते ५ वर्षासाठी आणि ५ ते १० वर्षासाठी ६.५ ऐवजी ७ टक्के व्याज मिळणार आहे. आजपासून हे व्याजदर लागू होणार आहेत.