नवी दिल्ली : अनेकदा पैशांची बचत करण्यासाठी अनेकजण ऑनलाईन तिकीट बुकिंग करतात. तुम्हीही अशाच प्रकारे ऑनलाईन तिकिट बुक करता? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
तुम्ही विमानाचं तिकिट आधीच ऑनलाईन बुक केलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिकीट रद्द करायचं असेल तर हा निर्णय तुम्हाला चांगलाच महागात पडू शकतो. कारण, कॅन्सलेशन चार्जेच पूर्वीपेक्षा आता अधिक करण्यात आले आहेत.
बुधवारी स्पाईसजेटने कॅन्सलेशन चार्जेस वाढवले आहेत. फ्लाईट तिकीटवर कॅन्सलेशन चार्जेस वाढवणारी स्पाईस जेट पहिली विमान कंपनी आहे.
भारतातील यात्रेचचं तिकीट रद्द केल्यास स्पाईसजेटकडून ३००० रुपये आणि आंतरराष्ट्रीय तिकीट रद्द केल्यास ३,५०० रुपये आकारले जाणार आहेत. यापूर्वी राष्ट्रीय तिकीटासाठी २,२५० आणि आंतरराष्ट्रीय तिकीट रद्द केल्यास २,५०० रुपये आकारले जात होते.
जर तुमचं तिकीट ३,००० रुपयांपेक्षा कमीचं आहे तर तुम्हाला टॅक्सचंही रिफंड केलं जाणार आहे.
यासोबतच गेल्या वर्षी एअर तिकीट बुक केल्यास कॅन्सलेशन चार्जवर लागणारी फिज पूर्वीपेक्षा डबल करण्यात आली आहे. गेल्या जानेवारीत स्पाईस जेटमध्ये तिकीट रद्द करण्याचा चार्ज १,८०० रुपये झाला आहे. कुठल्याही ऑनलाईन पोर्टलहून तिकीट बुक केल्यास टॅक्स रिफंड मिळणार आहे.