बिटकॉईन घसरला, एका तासात 1,000 डॉलरच्याही खाली....

केवळ एक तासात झालेल्या उलतापालथीत बिटकॉईनमध्ये तब्बल 1000 अमेरिकी डॉलर म्हणजेच 15 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 20, 2017, 06:07 PM IST
बिटकॉईन घसरला, एका तासात 1,000 डॉलरच्याही खाली.... title=

मुंबई : अनेकांच्या संपत्तीत आश्चर्यकारक भर घालणारा आणि व्हर्च्युअल करन्सी म्हणून जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या बिटकॉईनबद्द धक्कादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांत सतत चढता राहिलेला बिटकॉइन बुधवारी अचानक कोसळला. केवळ एक तासात झालेल्या उलतापालथीत बिटकॉईनमध्ये तब्बल 1000 अमेरिकी डॉलर म्हणजेच 15 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली.

बिटकॉईन एक्सचेंज मार्केट हॅक

या आठवड्याच्या सुरूवातीला बिटकॉईन 19,500 डॉलरवर पोहोचला होता. आता ही क्रिप्टोकरन्सी 17,376 अमेरिकी डॉलरच्या पातळीवर उलाढाल करत आहे. ब्लूमबर्ग न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार,  दक्षिण कोरिया एक्सचेंज मार्केट यूबिकला हॅक करण्यात आले आहे. त्यानंतर कंपनी बंद झाल्याचे किंवा दिवाळखोरीत काढण्याची प्रक्रिया केल्याची चर्चा सुरू झाली. याशिवाय अमेरिकेतील संस्थांनी बिटकॉईनशी संबंधीत शेअरबाजाराचा व्यवहारही निलंबीत केला होता. त्याचाही बिटकॉइनच्या घसरणीवर परिणाम झाला, असे बोलले जात आहे.

अमेरिकेतील बिटकॉन व्यवहार निलंबीत

क्रिप्टोकरन्सी कंपनीच्या शेअर्स मुल्यात सप्टेबरअखेर ते कालच्या सोमवार पर्यंत 1,700 टक्के फायदा झाला होता. दरम्यान, नोमुरा रिसर्च इन्स्टिट्यूटशी संबंधीत सीनिअर कन्सल्टंट रैयता यामागुची यांनी म्हटले आहे की, 'साऊथ कोरियाच्या एक्सचेंजला हॅक करण्यात आल्यामुळे अमेरिकेतील बिटकॉईन व्यवहारांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे बिटकॉईनमध्ये घरसर झाल्याचे' यामागुची यांनी सांगितले.