Railway कडून लवकरच ही सुविधा, प्रवाशांना होणार फायदा

प्रवाशांना होणार फायदा 

Railway कडून लवकरच ही सुविधा, प्रवाशांना होणार फायदा  title=

मुंबई : IRCTC -iPay ने प्रवास करणाऱ्यासांठी रेल्वे प्रशासनाने खुशखबर दिली आहे. आयआरसीटीसीकडून दिल्या जाणाऱ्या नव्या सुविधांमध्ये आयआरसीटीसीच्या रेल्वे कनेक्ट या वेबसाइटवरून तिकिट बुकिंग करण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी वेंडरची डिजीटल वॉलेटची गरज नाही. रेल्वेकडून कायमच प्रवाशांना सवलती देणाऱ्या नव्या सुविधा सुरू करण्यात येतात. काही दिवसांपूर्वी रेल्वे मदत आणि मेन्यू ऑन रेल हे दोन अॅप सुरू केले आहेत. 

पेमेंट एग्रीगेटरची तयारी 

नव्या सुविधेच्या अंतर्गत रेल्वे स्वतः पेमेंट एग्रीगेटर आणण्याची तयारी करत आहे. यानंतर तिकिट बुक करण्यासाठी बँक कार्ड आणि कॅश वॉलेटची गरज नाही. या पेमेंट एग्रीगेटरचं नाव आयआरसीटीसी आयपे (IRCTC-iPay) असं आहे. आयआरसीटीसीने ट्विटरयाबाबत माहिती दिली आहे. या एग्रीगेटर अॅप सुरू झाल्यानंतर ऑनलाइन फ्रॉड सारख्या घटनांवर आळा बसणार आहे. 

ऑगस्टमध्ये सुरू होणार सर्व्हिस

आयआरसीटीसीकडून सांगण्यात आलं की पेमेंट एग्रीगेटर IRCTC-iPay ही सुविधा अधिकृत वेबसाइटवर ऑगस्ट महिन्यात सुरू होणार आहे. पेमेंट एग्रीगेटर अॅपमध्ये अनेक पेमेंट ऑप्शन क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनॅशनल कार्ड, ऑटो डेबिट, यूपीआय, वॉलेट सारखे पर्याय देण्यात आले आहेत. ट्विटमधून दिलेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसीला PCI-DSS चे सिक्युरिटी सर्टिफिकिट मिळालं आहे. पेमेंट प्लॅटफॉर्म अंतर्गत माहिती दिली आहे.