सोनू पुन्हा वादात : 'फतवा काढणारे सुपारी देण्याचे काम करतात ?'

योगाला कोणत्याही धर्माशी जोडणे योग्य नसल्याचे सोनूने म्हटले आहे.  

Updated: Nov 11, 2017, 05:35 PM IST
सोनू पुन्हा वादात : 'फतवा काढणारे सुपारी देण्याचे काम करतात ?' title=

नवी दिल्ली : अजानसंबधी वक्तव्य केल्यानंत वादाच्या भोवऱ्यात सापडलेला गायक सोनू निगम हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याने 'त्या' फतव्या संदर्भात वक्तव्य केल्याने पुन्हा वाद ओढवून घेतला आहे. 

झारखंडमधील रांची येथे राहणारी रफीया ही मुस्लिम युवती योगा प्रशिक्षण घेते म्हणून तीला जिवे मारण्याचा फतवा काढल्याची बातमी सगळीकडे पसरली होती. यावर सोनु निगम यानेही वक्तव्य केले होते.

सुपारी देण्याचे काम

‘तरुणीला जीवे मारण्याचा फतवा काढणारा माणुस सुपारी देण्याचे काम करत आहे असे विधान सोनू निगम याने केले आहे. तसेच योगाला कोणत्याही धर्माशी जोडणे योग्य नसल्याची’ पुष्टीही त्याने जोडली आहे.
 

धर्म आणि योगा वेगळे

धर्म आणि योगा हे वेगवेगळे असून योगावरून सुरू असलेले धार्मिक राजकारण बंद व्हावे अशी इच्छा सोनुने यावेळी व्यक्त केली आहे. मुलीला जिवे मारण्याचा फतवा जाहीर केलेल्यांच्या वैचारिक पातळीचा विचार करुन मी त्रस्त झालो असल्याचे त्याने यावेळी सांगितले.

 माझे योगा शिक्षकही मुस्लिम

 सोनू याने यावेळी आपल्या घरचे उदाहरण दिले. मला आणि माझ्या बहिणीला योगा शिकवायला येणारा शिक्षक हा मुस्लिम होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना योगा शिकविला होता. योगा हा सुदृढ आरोग्यासाठी तसेच मनाचे संतुलन साधण्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरतो असे सोनू याने स्पष्ट केले.

काय नेमके प्रकरण ?

रफिया ही एमकॉमचे शिक्षण घेणारी तरुणी असून तिला योगाभ्यासात आवड आहे. योगगुरू रामदेव बाबा यांच्यासोबतचा तिचा फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. त्यानंतर मुस्लिम तरुणी योगा शिकत असल्याचा काही स्वयंघोषीत धर्मगुरूंनी विरोध केला. रफियाने योगाभ्यास सुरुच ठेवला तर तिला ठार मारु अशी धमकी तिला देण्यात आली होती. 

पोलिसांची सुरक्षा

झारखंडच्या पोलिसांनी रफियाला सुरक्षा पुरविली आहे. सध्या रफियाच्या सुरक्षेसाठी दोन पोलीस तैनात असतात. 

अझान प्रकरणीही वादात

 मस्जिदची अझान ऐकून रोज मला उठावं लागतं. कधी ही धार्मिक जबरदस्ती थांबणार आहे?' त्यानंतर त्याने आणखी एक ट्विट करताना म्हटलं की 'मला वाटत नाही की कुठल्या देवळात, गुरुद्वारामध्ये वीजेचा वापर करून त्या धर्माचं पालन न करणाऱ्या लोकांना जबरदस्ती झोपेतून उठवलं जातं. ही तर गुंडागर्दी आहे' असे वक्तव्य सोनूने काही महिन्यांपूर्वी केले होते. त्यांनतरही त्याला ट्रोल करण्यात आले होते.