सोनम कपूरच्या लग्नाची पत्रिका व्हायरल

सोनमच्या लग्नाची पत्रिका व्हायरल

Updated: May 2, 2018, 08:38 PM IST
सोनम कपूरच्या लग्नाची पत्रिका व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 7 मे ला सोनमची मेंहदी सेरमनी होणार आहे तर 8 मेला सोनमचं आनंद आहूजासोबत विवाह होणार आहे. सोनम कपूरच्या आई लग्नाची तयारी स्वत: करत आहे. याशिवाय बातमी अशी देखील आहे की, सोनमच्या संगीत कार्यक्रमात वडील अनिल कपूर डांस करणार आहेत. रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर देखील या कार्यक्रमात डान्स करणार आहेत. पण या सगळ्या आनंदात एका व्यक्तीची कमी असेल ती म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी यांची.

श्रीदेवी आज असत्या तर सोनमच्या विवाहात त्यांनी देखील डांस केला असता. मृत्यूच्या आधी श्रीदेवी यांनी दुबईमध्ये मोहित मारवाहच्या विवाहात देखील डांस केला होता. श्रीदेवी यांनी सोनमच्या लग्नात डांस करण्याची देखील इच्छा बोलून दाखवली होती. पण त्यांची ही इच्छा पूर्ण नाही होऊ शकली.

श्रीदेवी यांची लाडकी मुलगी जाह्नवी तिच्या आईचं स्वप्न पूर्ण करेल. जाह्नवी कपूर सोनमच्या विवाहात श्रीदेवी यांच्या हिट गाण्यांवर डांस करणार आहे. त्यासाठी जान्हवी तयारी देखील करत असल्याची चर्चा आहे.