नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. केंद्रिय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं की, नवनिर्माण योजनेच्या अंतर्गत देशातील लखनऊ, चेन्नई आणि गुवाहाटी या 3 एयरपोर्टचा विस्तार केला जाणार आहे. 3 ही एयरपोर्टच्या विस्तारासाठी जवळपास 5000 कोटी रुपये खर्च होणार आहेत.
लखनऊमध्ये 88,000 स्क्वेयर मीटरचा आणखी एक टर्मिनल बनवलं जाणार आहे. यामुळे स्थानीक आणि इंटरनॅशनल ट्रॅफिक हँडल करण्यासाठी सोपं होईल. याशिवाय चेन्नई आणि गुवाहाटी एयरपोर्टवर देखील नवीन टर्मिनल बनवले जाणार आहेत. यासाठी सरकारकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे.