या सुंदर महिला पोलीस अधिकारीला का टाकलं तुरुंगात? राहुल गांधींसोबत दिसली होती भारत जोडो यात्रेत

आपल्या फिटनेस सौंदर्यामुळे अल्पावधीतच सोशल मीडिायवर लोकप्रिय झालेली महिला पोलीस अधिकारी अडचणीत. अपहरण आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

Updated: Mar 7, 2023, 01:41 PM IST
या सुंदर महिला पोलीस अधिकारीला का टाकलं तुरुंगात? राहुल गांधींसोबत दिसली होती भारत जोडो यात्रेत title=

Naina Kanwal : सोशल मीडियावर (Social Media) आपला फिटनेस (Fitness) आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियात लोकप्रिय झालेली पोलीस अधिकारी नैना कंवल (Naina Kanwal) सध्या अडचणीत सापडली आहे. तिला तुरुंगात टाकण्यात आलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारतात जोडो यात्रेत नैना कंवल दिसल्यानंतर तिची जोरदार चर्चा झाली होती. नैना कंवलवर अपहरण (Kidnapping) आणि शस्त्रास्त्र कायद्यातंर्गत (Arms Act) कारवाई करण्यात आली आहे.

कोन आहे नैना कंवल? (Who is Naina Kanwal)
हरियाणाच्या (Hariyana) सोनपीत इथली निवासी असलेली नैना कंवल आंतरराष्ट्रीय स्तरावरची रेसलर (International Wrestler) आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर नैनाने क्रीडा क्षेत्रात आपल्या कामगिरीची छाप उमटवली आहे. एशियन चॅम्पियनशिपमध्ये तीने गोल्ड मेडलची कमाई केली आहे. तसंच 6 वेळा भारत केसरी आणि 7 वेळा हरियाणा केसरीचा मान तीने पटकावला आहे. नैना सोशल मीडियावरही सक्रिय असते. सोशल मीडियावर तीचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती आपले फिटनेसचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते, त्याला लोकांची चांगलीच पसंती मिळते. याशिवाय तिच्या सौंदर्याचेही लाखो फॅन्स आहेत. 

क्रीडा क्षेत्रातील चांगल्या कामगिरीनंतरही तिला हरियाणामध्ये नोकरी मिळाली नाही. त्यामुळे तिने राजस्थानला जाण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये तिला राजस्थान सरकारमध्ये स्पोर्ट्स कोट्यातून सब इन्स्पेक्टरची नोकरी मिळाली. पोलिसाचा गणवेश अंगावर असावी अशी तिची लहानपणापासूनची इच्छा होती. पण याच गणवेशामुळे तिला आज तुरुंगाची हवा खावी लागत आहे. 

नैनावर आरोप काय?
दिल्ली पोलिस एका अपहरणाच्या प्रकरणात तपास करत असताना त्याचे धागेदोरे नैना कंवलपर्यंत येऊन पोहोचले. दिल्ली पोलिसांनी नैनाच्या रोहतकमधल्या फ्लॅटवर छापा मारला. तिच्या घरात पोलिसांना बिना लायसन्सची दोन पिस्तुलं सापडली. पण पोलिसांना बघतात नैनाने घराच्या खिडकीत पिस्तूल खाली फेकून दिलं. पोलिसांनी ही पिस्तुलं जप्त केली. त्यानंतर या प्रकरणात नैनावर अवैध शस्त्र ठेवल्याप्रकरणी शस्त्रास्त्र कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 

यानंतर नैना कंवलला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने तिला तुरुंगात टाकण्याची शिक्षा सुनावली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत नैना कंवलने सहभाग घेतला होता. राहुल गांधी यांच्याबरोबर ती चालताना दिसली होती. यानंतर नैना कंवल खऱ्या अर्थाने चर्चेत आली.