Holi 2023 Upay For Marriage: वय वाढतंय... लग्न करायला हवं! अशी वाक्य घरातील मुलगा किंवा मुलगी अमुक एका वयात आल्यानंतर सुरु होतात. आपल्या मुलांची वयात लग्न होऊन ती संसाराला लागावीत अशीच प्रत्येक पालकाची इच्छा असते. अनेकांच्या नशीबात विवाहयोग अगदी सहजपणे येतो. तर, काहींना मात्र जोडीदारासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. अनेकांच्या वाटेत इतके अडथळे येतात की त्यांचा (Marriage Institution) विवाहसंस्थेवरून विश्वासच उडतो. मग सुरुवात होते सल्ल्यांची. हे करा म्हणजे ते मिळेल आणि हा उपवास करा म्हणजे ते स्थळ मिळेल. पण, तुम्हाला माहितीये का या लग्न न होणाऱ्या मंडळींची गाऱ्हाणी ऐकणाराही देव आहे...
राजस्थानमध्ये (Rajashtah Holi) किंबहुना देशातील काही भागांमध्ये होळीच्या एक दिवस आधी आणि होळीच्या या पर्वांमध्ये इलोजी देवता यांची पूजा केली जाते. लग्न होण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. अशी धारणा आहे की त्यानंतर वर्षभरातच त्या तरुणांचं लग्न होतं. मुख्यत्वे राजस्थानातील बाडमेर आणि जैसलमेर (Jaisalmer) येथे इलोजी देवता यांची विशेष मान्यता आहे. इथं मोठ्या संख्येनं अविवाहित तरुण इलोजी देवाची आराधना करतात. (Holika Dahan 2023 remedies for marriage importance of Eloji Devta maharaj read details )
असं म्हणतात की इलोजी देव यांचा संबंध हिरण्यकश्यपाचा मुलगा भक्त प्रह्लादाशी आहे. त्यांची पूजा करताना तरुण मूर्तीला प्रदक्षिणा घालतात ज्यानंतर गुलालाची उधळण होते. अशी मान्यता आहे की जो युवक देवाची 5 वेळा प्रदक्षिणा घालतो त्याचं लग्न लवकरात लवकर होतं.
इलोजी देवता भक्त प्रह्लादाची आत्या, होलिकाचे पती होते. ज्यावेळी होलिका तिच्या भावाकडे म्हणजेच हिरण्यकश्यपकडे आली तेव्हा प्रह्लादाच्या श्रीहरी भक्तिबाबत तिला सांगण्यात आलं आणि तिनं त्याला मारण्याचा निर्णय घेतला. होलिकेला वरदान होतं की अग्नी तिला क्षती पोहोचवू शकत नाही. पण, त्या क्षणी मात्र वरदानही फिकं ठरलं आणि होलिका भस्म झाली (Holika Dahan 2023) .
इलोजी देव यांना जेव्हा त्यांच्या पत्नीच्या निधनाची माहिती मिळाली, तेव्हा त्यांना अतोनात दु:ख झालं. ज्यानंतर त्यांनी पुन्हा कधीच लग्न केलं नाही. तेव्हापासूनच ज्यांची लग्न ठरण्यात अडचणी निर्माण होत असत ती मंडळी या इलोजी देव यांची पूजाअर्चा करत असत.