नवी दिल्ली : लोकसभेत शिवसेना खासदार अरविंद सावंतांच्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्यात. कुलभूषण जाधावांच्या कुटुंबीयांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा यावेळी निषेध करण्यात आला.
कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्ताननं दिलेल्या वागणुकीचे पडसाद आज लोकसभेत उमटले. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी कामकाज सुरु होताच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. प्रश्नोत्तराच्या तासात पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी सावंतच्या घोषणांना पाठिंबा दिला.
लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी खासदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळ वाढत गेला आणि लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधवांच्या आई आणि पत्नीला देशात बोलावल्यावर पाकिस्तानानं आपली लायकी दाखवून दिलीय.
कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत कपडे बदलायला लावलं. तसंच सौभाग्याचं लेणं असेलेली टिकलीही काढून ठेवायला लावलं. तसेच त्यांचे बुटही दिले नाहीत. भेटीच्या खोलीत जाण्याआधी जाधव यांच्या पत्नी व आईला त्यांची पादत्राणे बाहेर काढून ठेवायला सांगितले गेले. मात्र भेटीनंतर, वारंवार विनंती करूनही जाधव यांच्या पत्नीला त्यांचे बूट परत दिले गेले नाहीत. पाकिस्तानच्या या कृतीचा भारतानं तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.