नवी दिल्ली : 'स्कोडा' या कंपनीनं भारतात आपली ७ सीटर एसयूव्ही Kodiaq लॉन्च केलीय.
महत्त्वाचं म्हणजे या सेगमेंटमध्ये स्कोडाची ही पहिलीच कार आहे. या सेगमेंटमधील प्रस्थापित 'टोयोटा फॉर्च्युनर' आणि 'फोर्ड एन्डाव्होअर'शी या गाडीचा मुकाबला असेल.
स्कोडा Kodiaq मध्ये १९६८ सीसी फोर सिलिंडर, टर्बो-डिझेल इंजिन दिलंय. ज्यात १५० hp पॉवर आणि ३४० Nm पिक टॉर्क निर्माण करेल. सोबतच यात ७ स्पीड ड्युएल क्लच ऑटोमेशन ट्रान्समिशन दिलं गेलंय.
या एसयूव्हीमध्ये मोठं फ्रंटड ग्रिल, एलईडी डे टाईन रनिंग लाईटस् आणि एलईडी हॅडलॅन्ससोबतच १८ इंच व्हीकल्स दिले गेलेत. तसंच यात नेव्हिगेशन, अॅपल कार प्ले आणि अॅन्ड्रॉईड ८.० इंच टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आलंय.
या कारची दिल्ली शोरुम किंमत ३४.४९ रुपये आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या एसयूव्हीमध्ये ग्राहकांना १६.२५ kmpl मायलेज मिळेल.