काय सांगता! 30 वर्षाची वधू अन् 60 वर्षाचा वर, बहीण-भावाची अनोखी प्यारवाली लवस्टोरी

भारतीय परंपरेनुसार बहीण-भावामध्ये लग्न केलं जात नाही. कारण बहीण-भावाचं नातं अतूट विश्वासाचे सर्वात पवित्र मानलं जातं. मात्र परदेशामध्ये असं काही मानलं जात नाही, अशातच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये एका बहिणीने आपल्या भावासोबत लग्न केलं आहे.

Updated: Jan 27, 2023, 06:22 PM IST
काय सांगता! 30 वर्षाची वधू अन् 60 वर्षाचा वर, बहीण-भावाची अनोखी प्यारवाली लवस्टोरी title=

Viral News : भारतीय परंपरेनुसार बहीण-भावामध्ये लग्न केलं जात नाही. कारण बहीण-भावाचं नातं अतूट विश्वासाचे सर्वात पवित्र मानलं जातं. मात्र परदेशामध्ये असं काही मानलं जात नाही, अशातच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये एका बहिणीने आपल्या भावासोबत लग्न केलं आहे. संबंधित महिला ही 30 वर्षाची असून तिने ज्या भावासोबत लग्न केलं आहे तो तिच्या वयापेक्षा दुपट्टीने मोठा आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?
बायको आणि नवऱ्यामध्ये जास्तीत जास्त 10 ते 12 वर्षांचं अंतर असलेलं पाहायला मिळतं. मात्र ब्राझीलमधील एका कपलमधील दोघांच्या वयामध्ये तब्बल 29 वर्षांचे अंतर आहे. संबंधित महिलेचं नाव हे डेबोरा असून तिच्या पतीचं अँडरसन आहे. दोघे एकमेकांचे बहीण-भाऊ आहेत. डेबोरा ही अँडरसनची चुलत बहीण आहे.

ब्राझीलमधील हे कपल असून दोघांच्या लग्नाला आता 6 वर्षे झाली आहेत. दोघांची पहिली भेट झाली त्यानंतर चार दिवस एकत्र घालवले आणि तीन महिन्यातच दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्न केल्यावर डेबोराला तिथल्या लोकांनी खूप टोमणे मारले. तिला आताही सर्वजण असे बोलतात की, फक्त आणि फक्त पैशासाठी तिने अँडरसनसोबत लग्न केलं आहे. 

डेबोराने यावर बोलताना सांगितलं की, अँडरसन  हा वयाने मोठा असल्याने मला लोकांनी खूप डिवचलं आणि टोमणे मारले. कारण अँडरसन माझा चुलत भाऊ लागतो पण माझं पहिल्या भेटीतच त्याच्यावर प्रेम झालं होतं.  

दरम्यान, आपल्याकडे क्वचित जास्त वयाच्या पुरूषासोबत लग्न केल्याची प्रकरण समोर आली असावीत. मात्र नात्यामधील चुलत भावासोबत लग्न करण्याचा सहजासहजी कोण विचारही करणार नाही.