Video: 'ताजमहाल' हा शब्द पाहाताच त्यानं केलं असं काही की बघणारे बघतच राहिले अन्...

Viral Video: आपल्या इतिहासाबद्दलही (History) तितकेच प्रेम वाटत असते त्यामुळे आपलेही त्याबद्दलचे कुतूहल कमी होताना दिसत नाही. आपल्या डोळ्यासमोर काही दिसले की आपल्यालाही त्याच्या अधिक खोलात जावेसे वाटते. 

Updated: Jan 27, 2023, 05:48 PM IST
Video: 'ताजमहाल' हा शब्द पाहाताच त्यानं केलं असं काही की बघणारे बघतच राहिले अन्...  title=

Viral Video: आपल्या इतिहासाबद्दलही (History) तितकेच प्रेम वाटत असते त्यामुळे आपलेही त्याबद्दलचे कुतूहल कमी होताना दिसत नाही. आपल्या डोळ्यासमोर काही दिसले की आपल्यालाही त्याच्या अधिक खोलात जावेसे वाटते. आपण आपल्या आवडणारी नवी गोष्ट आपल्याला ट्राय करावीशी वाटते. सध्या अशाच एका तरूणानं आपल्याला आवडीनं काहीतरी हटके ट्राय करायचा प्रयत्न केला आहे. फळ्यावर फक्त एकच शब्द लिहिला होता ज्यातून त्यानं चक्क ताजमहालाचं (Tajmahal) साकार केला आहे. तुम्ही विचार केला असेल की नक्की त्यानं असं काय केलं आहे ज्यातून फक्त एका शब्दामधूनच या तरूणानं चक्क ताजमहालाचं आपल्या डोळ्यासमोर साकार केला आहे. कसा, ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतरच कळेल. (a young man draws a tajmahal on blackboard with the word of tajmahal in few seconds)

लोकांमध्ये त्यांची त्यांची क्रिएटिव्हीटी आहे तेव्हा त्या क्रिएटिव्हीटीतून (Creativity) ते आपल्या शैलीचा पुरस्कार करत असतात. कधी एक सुंदर चित्र साकार करतात तर कधी एक सुंदरशी मुर्ती साकार करतात. त्यामुळे त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात एक तरूण चक्क ताजमहाल हा शब्द लिहितो काय आणि त्यातून एक मोठा ताजमहाल साकार करतो काय? तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. त्यानं चक्क काही सेकंदाचं एका शब्दातून ताजमहाल साकार केला आहे.  

सध्या हा व्हिडीओ सगळीकडे खूपच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये हा इसम फक्त ताजमहाल (Tajmahal Drawing) हा शब्द पाहतो आणि त्यातून संपुर्ण ताजमहालचे चित्र साकारतो. एका खडूनं तो हे चित्र साकार करतो. एका फटक्यात तो हे चित्र पुर्ण करतो. त्यामुळे त्याच्या या क्रिएटिव्हीटीला सगळेच दाद देत आहेत. सध्या या व्हिडीओवर अनेकांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. लोकांना त्याची क्रिएटिव्हीही प्रचंड प्रमाणात आवडली आहे. त्याच्याखाली अनेकांनी खूप चांगल्या कमेंट्स केल्या आहेत. 

काहींनी या कलेकडे पाहून चक्क शाहजहानलाही आठवलं आहे. काही यूजरनं असं लिहिलं आहे की, आज जर शाहजहाॅं जिवंत असता तर त्याला खूपच आनंद झाला असता किंवा काहींनी तर असे लिहिले आहे की, आज जर शाहजहाॅं (Shah Jahan) तर त्यानं याचे हातही कापले असते. त्यामुळे सध्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स (Comments) केल्या आहेत आणि हा व्हिडीओही शेअर (Video Share) झाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओला आत्तापर्यंत 26 लाख लोकांनी पाहिले आहे. सध्या या व्हिडीओला चांगले लाईक्सही येताना दिसत आहेत.