नवी दिल्ली : मस्जिदवरून दिल्या जाणाऱ्या 'अझान'वरून पुन्हा एकदा एका सेलिब्रिटीनं वादग्रस्त ट्विट केलंय. त्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते अबु आझमी मागे राहतील तरच नवल... त्यांनी अभिनेत्रींवर वादग्रस्त वक्तव्य केलंय.
अभिनेत्री आणि गायिका सुचित्रा कृष्णमूर्तीनं अझानच्या आवाजावरून त्रास होत असल्याचं ट्विट केलंय. इतकंच नाही तर, सुचित्रानं अझानला 'असभ्य'ही म्हटलंय.
'मी सकाळी ४.४५ वाजता घरी पोहचले आणि कान फाडणाऱ्या अझानचा आवाज ऐकला. जबरदस्तीनं थोपवण्यात आलेल्या धार्मिकतेपेक्षा वाईट काही असू शकत नाही' असं ट्विट सुचित्रानं केलंय.
well the azaan seems to have gotten louder since his tweet. Its ridiculous. He tweeted from same location as me https://t.co/ZRl06bEewu
— Suchitra (@suchitrak) July 23, 2017
nobody objects to azaan or prayers during decent hours. But to be wakung up entire neighbourhood at 5 am is not civilized https://t.co/PBT94NtuGN
— Suchitra (@suchitrak) July 23, 2017
Extreme religiousity dumbs and dwarfs the mind & restricts free thought. Applicable to all religions
— Suchitra (@suchitrak) July 24, 2017
Loudspeakers are not allowed between 10 pm to 6 am. Yet this law is repeatedly broken for azaan . Poilce & everyone else turns a blind eye. https://t.co/szr08QWP60
— Suchitra (@suchitrak) July 24, 2017
याआधी गायक सोनू निगमनं अझानवरून वादग्रस्त ट्विट केलं होतं. यावरून वाद झाल्यानंतर त्याला ट्विटर अकाऊंटच बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता सुचित्राच्या ट्विटनंतर पुन्हा एकदा वाद सुरू झालाय.
सुचित्राच्या ट्विटनंतर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी 'अभिनेत्रींना अर्धे कपडे परिधान करून नाचायला मजा येते... गळ्यात हात घालून मजा येते... भारतीय संस्कृतीला मस्करी बनवून टाकलंय... यूपीत रात्रभर भजन-किर्तन सुरू असतं त्याचं कोणताही मुसलमान विरोध करत नाही' असं म्हटलंय.