Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी मोठा पुरावा दिल्ली पोलिसांच्या हाती लागलं आहे. आफताब पुनावालाचं (Aaftab Poonawala) सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आलं आहे. श्रद्धाची (Shraddha Walkar) हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या शरीराचे 35 तुकडे केले आणि ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर दररोज तो ते तुकडे मेहरौलीच्या जंगलात (Mehrauli Forest) फेकायचा. यावेळचं काही दृष्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे पिशवीतून घेऊन जात असतानाचं रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. ज्या ठिकाणी जंगलात हे तुकडे फेकण्यात आले आहेत, त्या ठिकाणी जाऊन पोलीस शोध घेत आहेत.
आफताबच्या घरात सापडली हत्यारासारखी वस्तू
दरम्यान, दिल्लीतील ज्या घरात श्रद्धाची हत्या झाली त्या घरात पोलिसांना एक हत्यारासारखी वस्तू सापडलीये. गुरुग्राममध्येही (Gurugram) श्रद्धाच्या हत्येच्या तपासाला वेग आलाय. तर मुंबईतही पोलिसांनी (Mumbai Police) श्रद्धाच्या दोन मित्रांची चौकशी केलीये.. यातून पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागलीये. छत्तरपूर येथील जंगलात पोलिसांना काही हाडं (Bones) सापडलीत यात पायाच्या, कंबरेच्या आणि मांडीच्या हाडांचा समावेश आहे.. यातील सर्वात मजबूत हाडावर हत्यानं वार केल्याच्या खुणा आहेत. ही हाडं श्रद्धाची आहेत का याचाही तपास सुरु आहे.
जंगलात सापडलेली हाडं कोणाची?
आफताबने दिलेल्या जबाबानंतर दिल्ली पोलीसांनी (Delhi Police) 16 नोव्हेंबरला 3 वेळा त्या ठिकाणी शोध घेतला ज्या ठिकाणी आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फेकल्याचा दावा केला. पोलिसांना जंगलात काही हाडं सापडली आहेत. माणसाच्या शरीरातील हाडांसारखी ही हाडं असून त्यावर घाव घातल्याचे निशाण आहेत. पण ही हाडं श्रद्धाची आहेत किंवा इतर कोणाची हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
श्रद्धाच्या हत्येमागे लव्ह जिहाद
दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्येमागे लव्ह जिहाद (Love Jihad) असल्याचा आरोप भाजपने (BJP) केलाय. आरोपी आफताब पुनावालाला तातडीने फाशी द्या या मागणीसाठी दादरमध्ये भाजप महिला मोर्चाने आंदोलन केलंय. भाजपच्या शीतल गंभीर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करत श्रद्धाला न्याय द्या अशी मागणी केलीय.