Delhi Shraddha Murder Case: श्रद्धा हत्या प्रकरणाता दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपताबने (Aaftab Poonawala) श्रद्धाला मारण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला होता. हत्या केल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवलेल्या तिच्या चेहऱ्याचा तो मेकअप करत असे आणि गप्पाही मारत होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या चौकशीत आफताब सारके जबाब बदलत आहे, त्यामुळे त्याची नार्को टेस्ट (Narco Test) केली जाण्याची शक्यता आहे.
रक्ताचे नमुने तपासणार
श्रद्धा आणि आपलं ब्रेक अप झालंय असं भासवण्याचाही आफताबचा प्लॅन होता. श्रद्धाच्या मोबाईलमधून आफताबने ऑनलाईन व्यवहार (Online Transaction) केले होते. तीच्या अकाऊंटमधून त्याने स्वत:ला 54 हजार रुपये पाठवले होते. हत्या केल्यानंतर महाराष्ट्रासह विविध राज्यांत त्याने प्रवास केल्याचंही समोर आलंय. शिक्षेतून सुट मिळावी यासाठी आफताब वेडेपणाचं नाटक करत असल्याचा दावाही पोलिसांनी केलाय. दरम्यान फॉरेन्सिक टीमला (Forensics Team) फ्रीजमध्ये कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. पण किचनमध्ये सापडलेल्या रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आलेत.
याआधीही जीवे मारण्याचा प्रयत्न
दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार आफताब आणि श्रद्धा यांच्यात भांडणं होत होती. त्यामुळे तिला मारण्याचा आफताबने अनेकवेळा विचार केला. पण अटक होण्याच्या भीतीने त्याने हिम्मत केली नाही. श्रद्धाते इतर मित्र मैत्रिणी तिच्या संपर्कात असल्याने आफताबने याआधी विचार करुनही तसं पाऊल उचचलं नव्हतं.
हत्या करताना आफताबच्या हाताला जखम
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताब जखमी झाला होता का असा प्रश्न आता निर्माण होतोय. कारण श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार समोर आलाय. आफताबच्या तळहाताला जखम झाली होती. तेव्हा दिल्लीमधील जनरल सर्जन असणारे डॉक्टर अनिल सिंह यांनी आफताबच्या हातावर टाके घातले होते. फळं कापताना जखम झाल्याचं आफताबनं डॉक्टरना सांगितलं होतं. श्रद्धाची हत्या 18 मेला झाली होती आणि त्यानंतरच आफताब टाके घालण्यासाठी गेला होता. त्यामुळे तुकडे करताना ही जखम झाली का असा संशय उपस्थित होतोय.
आफताबची होणार नार्को टेस्ट
श्रद्धा वालकरची निर्घुण हत्या करणाऱ्या आफताबची आता नार्को टेस्ट केली जाणार आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टानं दिल्ली पोलिसांना नार्को टेस्ट करण्याची परवानगी दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत आफताब अजिबात सहकार्य करत नाहीए. उलट तो उलटसुलट उत्तरं देत चौकशी भरकटवण्याचा प्रयत्न करतोय. श्रद्धाचा मोबाईल कधी महाराष्ट्रात तर कधी दिल्लीत फेकल्याचं तो सांगतोय. त्यामुळे नेमकी माहिती मिळवण्यासाठी पोलिस नार्का टेस्ट करणार आहेत.