मुंबई : हल्ली मुलांचा निकाल जवळ आला की पालक भरपूर टेन्शनमध्ये असतात. मुलं कधी कोणत्या कारणामुळे टोकाचा पाऊल उचलतील याचा काही नेम नाही म्हणून पालक आता सतर्कतेचा इशारा म्हणून काळजी घेत आहेत. अशीच काळजी मध्यप्रदेशच्या एका कुटुंबाने घेतली आहे.
हा प्रकार थोडा चक्रावणारा आहे पण महत्वाचा आहे. मध्यप्रदेशमध्ये 10 वी आणि 12 वीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात अनेक विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा मिळाली आहे. मात्र इथे एका विद्यार्थ्याच्या नापास होण्यामुळे पालकांनी चक्क उत्साह साजरा केला आहे. नापास झाल्यावर कुटुंबियांनी जल्लोष साजरा केल्याचा हा पहिला प्रकार आहे. या कुटुबियांनी फटाके फोडून, मिठाई वाटून साजरा केला उत्सव.
सरस्वती शिशु मंदिरात 10 वीत शिकणाऱ्या छात्र असणाऱ्या आशु व्यास 6 विषयांपैकी 4 विषयांत नापास झाला आहे. निकाल हाती लागताच आशु व्यासचे वडिल सुरेंद्र व्यास आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी रागवण्यापेक्षा आनंद व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. हे करण्यामागाचं कारण ऐकाल तर तुम्हाला देखील धक्का बसेल. आज विद्यार्थी नापास झाल्यावर आत्महत्या करतात किंवा घर सोडून जातात. असा टोकाचा निर्णय आपल्या पाल्याने घेऊ नये यासाठी व्यास कुटुंबियांनी इतका मोठा आणि वेगळा निर्णय घेतला.
घरातल्या व्यक्तींनी इतक्या चांगल्या प्रकारे विषय हाताळल्यामुळे आशुला खूप मोठा धक्का बसला. आणि आता त्याने खूप चांगला अभ्या करून दहावीची परिक्षा पास होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या पालकांनी इतर पालकांप्रमाणे न रागवता माझा नापास होण्याच कौतुक केल्यामुळे आता माझ्यावर मोठी जबाबदारी असल्याचं त्याने सांगितलं आहे.