देशात पहिल्यांदा पित्याशिवाय मुलीचा जन्म

प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसणारी घटना तामिळनाडू घडली आहे. देशभरातील ही पहिलीच घटना आहे जिथे पित्याशिवाय मुलीचा जन्म झाला आहे. मद्रास हायकोर्टाच्या आदेशानंतर एका आईला आपल्या मुलीचा जन्माचा दाखला मिळाला आहे ज्यामध्ये वडिलांच नावच नाही. हा नेमका प्रकार काय आहे जाणून घ्या 

देशात पहिल्यांदा पित्याशिवाय मुलीचा जन्म  title=

मुंबई : प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसणारी घटना तामिळनाडू घडली आहे. देशभरातील ही पहिलीच घटना आहे जिथे पित्याशिवाय मुलीचा जन्म झाला आहे. मद्रास हायकोर्टाच्या आदेशानंतर एका आईला आपल्या मुलीचा जन्माचा दाखला मिळाला आहे ज्यामध्ये वडिलांच नावच नाही. हा नेमका प्रकार काय आहे जाणून घ्या 

तामिळनाडूमधील मधुमिता रमेश यांनी आपली मुलगी तविशी परेरा हिच्या जन्माचा दाखला मिळवण्याकरता मोठी लढाई पूर्ण केली आहे. आता मद्रास हायकोर्टाने त्रिची नगर निगम यांना आदेश दिला आहे की, मधुमती यांनी मुलीच्या वडिलांच नाव देखील विचारायचं नाही. 

असा झाला होता मुलाचा जन्म 

मधुमिता अनेक दिवसांपूर्वी आपला नवरा चरणपासून वेगळी राहत आहे. यानंतर गेल्यावर्षी एप्रिलमध्ये सीमन डोनरच्या मदतीने इंट्रायूटेरिन फर्टिलिटी ट्रीटमेंट अंतर्गत एका मुलीला जन्म दिला आहे. 

कोर्टात अशी सुरू होती लढाई 

सप्टेंबर 2017 मध्ये मधुमिताच्या अपीलवर हायकोर्टाने संशोधनाचे आदेश दिले होते. मात्र ते हटवण्यात आले आणि असं सांगण्यात आलं की याचा अधिकार रजिस्ट्रार ऑफ बर्थ अॅण्ड डेथ्सकडे आहे. रिपोर्टनुसार, न्यायाधीश एम एस रमेश यांना जेव्हा कळलं की, मधुमिताने आपल्या मुलीला जन्म हा विशेष ट्रिटमेंटच्या मदतीने दिला आहे तेव्हा त्यांनी या गोष्टीचा स्विकार केला. 

 जबरदस्तीने लिहिलं होतं वडिलांच नाव 

त्रिची येथे तविशीचे जो जन्माचा दाखला बनवला होता त्यामध्ये तिच्या वडिलांचे नाव या रकान्यात मनीष मदनपाल मीना असं लिहिलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, या उपचारादरम्यान मधुमिताला मनीष यांनी मदत केली होती. यानंतर मधुमिताने हे नाव हटवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. मात्र तिला सांगण्यात आलं की नाव बदलणं शक्य आहे पण काढून टाकणे अशक्य आहे.