दिल्लीत शिवसेना नेत्यांची अहमद पटेलांशी चर्चा

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर नेमकी काय भूमिका शिवसेनेची आणि काँग्रेसची असेल. 

Updated: Nov 11, 2019, 02:13 PM IST
दिल्लीत शिवसेना नेत्यांची अहमद पटेलांशी चर्चा title=

नवी दिल्ली : दिल्लीत शिवसेना नेते अनिल देसाई, अरविंद सावंत तसेच उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, हे सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याशी चर्चा करत असल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर नेमकी काय भूमिका शिवसेनेची आणि काँग्रेसची असेल. तसेच एकमेकांची काय भूमिका असेल, यावर ही चर्चा असल्याचं सांगण्यात येत आहे.

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देईल, सत्तेत सहभागी होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. तर राष्ट्रपती राजवट राज्यावर लादली जावू नये, म्हणून पर्यायी सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेसची असल्याचं सांगण्यात येत आहे.

मात्र अजूनही काँग्रेस यावर सावध भूमिका घेत सर्वकाही ठंडा कर के खाओ याप्रमाणे सर्वकाही स्पष्ट झाल्यानंतर पाठिंब्यावर निर्णय़ घेणार असल्याचं दिसून येत आहे.