Raju Shirvastav : राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत पत्नीकडून मोठी अपडेट

कॉमेडी स्टार राजू श्रीवास्तव (Raju Shirvastav) यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु आहेत.

Updated: Aug 19, 2022, 08:55 PM IST
Raju Shirvastav : राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत पत्नीकडून मोठी अपडेट title=

नवी दिल्ली : कॉमेडी स्टार राजू श्रीवास्तव (Raju Shirvastav) यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु आहेत. मात्र दुर्देवाने त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळत नाहीये. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर त्यांचं ब्रेन डेड झाल्याचंही समोर आलं. मात्र याबाबत मिसेस शिखा श्रीवास्तव (Shikha Shirvastav) यांनी मोठी माहिती दिली आहे. तसेच ते लवकरच चाहत्यांचं मनोरंजनासाठी परततील, अशी आशा त्यांनी व्यक्त केला. (shikha shirivastav give raju shirvastav health update)

मिसेस श्रीवास्तव काय म्हणाल्या?

"राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर त्यांना लवकरात लवकर बरं करण्यासाठी खूप प्रयत्न करतायेत. ते एक फायटरप्रमाणे झुंज देत आहेत. मला रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांवर पूर्ण विश्वास आहे. राजू श्रीवास्तव ही लढाई जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहेत. ते लवकरच परतून तुमच्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी परततील. हे माझं तुम्हाला आश्वासन आहे", असा विश्वास मिसेस श्रीवास्तव यांनी व्यक्त केला. मिसेस श्रीवास्तव यांनी माध्यमाशी संवाद साधताना ही माहिती दिली.
 
"अनेक चाहते श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतायेत. मला विश्वास आहे की तुम्ही करत असलेली प्रार्थना इश्वर नक्कीच स्वीकार करेल. तुम्ही फक्त अशाच प्रकारे त्यांच्या तब्येतीसाठी देवाकडे प्रार्थना करत रहा", असं आवाहन मिसेस श्रीवास्तव यांनी केलं.

"भूतलावर डॉक्टर हे देवच आहेत. डॉक्टर आपले 100 टक्के देतायेत. डॉक्टरांनी उत्तर दिलंय हे चुकीचं आहे. आपल्याला आणखी काही दिवस वाट पहावी लागेल. राजू श्रीवास्तव आणि डॉक्टरांचं पथक दोघेही लढतायेत. लवकरच चांगली बातमी समोर येईल. ते नक्कीच मनोरंजनासाठी परत येतील", असा पुनरुच्चार मिसेस श्रीवास्तव यांनी केला. 

डोक्यातील काही शिरांमध्ये सूज

राजू श्रीवास्तव यांच्या व्यवस्थापकानेही महत्त्वाची माहिती दिली. राजू श्रीवास्तव यांचं ब्रेन डेड नसल्याचं पुष्टी व्यवस्थापकाने केली. ते बेशुद्ध आहेत. त्यांच्या मेंदूच्या नसांना सूज आली होती. त्यांना काही औषधे दिली. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यानंतर काही इंजेक्शन्सही देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या मेंदूच्या काही नसा सुजल्या.  ज्यावर डॉक्टर उपचार करत आहेत, असंही व्यवस्थापकाने स्पष्ट केलं.