मुंबई : राकेश झुनझूनवाला, डॉली खन्ना आणि आशिष कचोलिया सारख्या दिग्गज गुंतवणूकदारांनी जूनच्या तिमाही केलेली होल्डिंग आता समोर येत आहे. राकेश झुनझूनवाला यांनी ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेत त्यात सर्वात पहिले नाव Edelweiss Financial Services चे आहे.
राकेश झुनझूनवाला, डॉली खन्ना आणि आशिष कचोलिया सारख्या दिग्गज गुंतवणूकदारांनी जूनच्या तिमाहीमध्ये केलेली होल्डिंग आता समोर येत आहे. राकेश झुनझूनवाला यांनी जूच्या तिमाहीमद्ये ज्या कंपन्यांचे शेअर खरेदी केले त्या सर्वात पहिले नाव Edelweiss Financial Services या कंपनीचे येते. या कंपनीत झुनझूनवाला यांनी 0.4 टक्के भागीदारी वाढवली आहे. आता त्यांच्या कडे कंपनीची एकूण 1.6 टक्के भागीदारी आहे.
त्यामुळे Edelweiss Financial Servicesच्या शेअर्स इंट्राडेमध्ये साधारण 9 टक्क्यांनी वाढलेले दिसले. राकेश झुनझूनवाला यांच्या buying कडे गुंतवणूकदारांची नेहमीच नजर असते.
डॉली खन्ना यांची Talbros मधील भागिदारी वाढली
Aitomotive Comonents मध्ये 03 टक्के भागिदारी वाढली आहे. त्यांच्याकडे कंपनीचे एकूण 186054 शेअर्स आहेत. ज्यांची व्हॅल्यू 5.7 कोटी आहे. तसेच NCL Industries Ltd मध्ये 0.1 टक्के भागिदारी वाढवली आहे.
डॉली खन्ना यांनी Mangalore Chemicals & Fertilizers मध्ये 0.21 टक्के भागिदारी कमी केली आहे. Rain Industries मध्ये त्यांनी 0.14 टक्के भागीदारी कमी केली आहे.
आशिष कचोलिया यांची खरेदी
आशीष कचोलिया यांनी जून तिमाहीमध्ये IOL केमिकल्स आणि फार्मा मध्ये 0.4 टक्के भागिदारी वाढवली आहे. तसेच Safari Industriesमध्ये देखील त्यांनी 0.2 टक्के भागिदारी वाढवली आहे.