कर्नाटकात भाजपच्या अपयशावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Updated: May 19, 2018, 10:20 PM IST

मुंबई : गेले तीन दिवस रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर कर्नाटकमध्ये बहुमत सिद्ध करण्यात भाजपाला अपयश आलंय. विश्वासदर्शक ठराव मंजूर होणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर बी.एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात शरद पवारांची प्रतिक्रिया...

येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस-जेडीएस सरकार स्थापनेचा दावा केला आहे. राज्यपालांची भेट घेत सत्तस्थापनेचा दावा केल्यावर राज्यपाल वजुभाई वाला यांनी सरकार स्थापनेचं निमंत्रण कुमारस्वामींना देण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कुमारस्वामी कर्नाटकचे मुख्यमंत्री बनतील. सोमवारी म्हणजेच २१ मे रोजी कुमारस्वामी आपल्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

विश्वासदर्शक ठराव मंजूर होणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर बी.एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पाऊणेचारच्या सुमारास येडियुरप्पा विधानसभेत भाषणासाठी उभे राहिले. अत्यंत भावनिक झालेल्या या भाषणात त्यांनी सर्वात मोठा पक्ष असूनही सरकार स्थापन करण्यात अपयश येत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आपल्याला कर्नाटकच्या जनतेसाठी काय-काय करायचं होतं, याचा पाठाच त्यांनी वाचला.

आगामी काळात राज्यभर फिरू आणि येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सर्व २८ जागी निवडून आणू अशी गर्जनाही त्यांनी केली. त्यानंतर आपण राजीनामा देण्यासाठी राजभवनावर जात असल्याचं येडियुरप्पांनी जाहीर केलं आणि ते विधानसभेतून निघून गेले.