Crime News : त्याच्याबरोबर संपूर्ण आयुष्य घालवण्याचं ठरवलं. लग्नाच्या शपथा घेतल्या, त्याच्या नावाचा टॅटू (Tattoo) हातावर गोंदवला. त्याचाच काटा काढला. पण त्याच प्रियकराचा (BoyFriend) प्रेयसिने (GirlFreind) काटा काढला. प्रियकराला फिरायला जायचं असल्याचं सांगून बोलावून घेतलं आणि त्याची गळा चिरुन हत्या केली. या गुन्ह्यात मुलीच्या भावाने तिला मदत केली. दोन वर्षांपूर्वी या दोघांची ओळख झाली आणि हळुहळू दोघांमध्ये प्रेम फुललं. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांच्या जाती वेगवेगळ्या असल्याने मुलाच्या कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता.
दिल्लीतल्या शाहीनबागमधली (Shahinbaug) ही धक्कादायकघटना आहे. कुटुंबियांचा वाढता विरोध पाहाता मुलानेही मुलीला लग्नासाठी नकार दिला. या गोष्टीने मुलगी संतापली आणि तीने बदला घेण्याचा ठरवलं. मुलीने भावासोबत मिळून त्याला संपण्याचा कट रचला. शेवटचं भेटायचं असल्याचं सांगत मुलीने त्याला बोलावून घेतलं दोघं शाहीनबागवरुन मसूरीला फिरायला गेले. इथेच मुलीने धारदार शस्त्राने प्रियकराचा गळा चिरला आणि त्याची निर्घृण हत्या केली.
मसुरीमधल्या एका हॉटेलच्या खोलीत तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाल, त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलीचं नाव कुदरत आहे तर मुलाचं नाव कपिल चौधरी असं आहे. कपिलचे वडील हे पोलीस आहेत. कुदरत आणि कपिल यांच्या प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये शारिरीक संबंधही निर्माण झाले होते. कपिल आणि कुदरतने लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण कपिलच्या कुटुंबियांनी या लग्नाला तीव्र विरोध केला. कुटुंबियांच्या दबावापुढे कपिलही झुकला त्याने कुदरता लग्न करु शकत नसल्याचं कळवलं. पण कुदरतचं कपिलवर मनापासून प्रेम होतं. कपिलने लग्नाला नकार दिल्याने कुदरत नैराश्यात गेली. तिने या गोष्टीचा बदला घेण्याचा निर्णय घेतला.
घटनेच्या दिवशी कुदरतने कपिलला हरिद्वारला बोलावलं. तिथून ते मसूरीला गेले. तिथे त्यांनी एका हॉटेलमध्ये रुम बूक केला. कुदरतने आधीच तिथे आपल्या भावाला बोलावून घेतलं होतं.
मसूरमध्ये कुदरतने पुन्हा एकदा कपिलला लग्नाविषयी विचारलं. पण कपिलने त्याला नकार दिला. त्यावरुन दोघांमध्ये कडाक्याची भांडणं झाली. त्यानंतर दोघंही रुमवरच थांबले. रात्री गाढ झोपेत असताना कुदरत आणि तिच्या भावाने कपिलच्या गळ्यावर चाकूने वार केला. यात कपिलचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कुदरत आणि तिच्या भावाने कपिलचा मृतदेह बेडच्याखाली लपवला आणि तिथून ते फरार झाले. दुसऱ्या दिवशी हॉटेल कर्मचाऱ्यांना कपिलचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत कुदरत आणि तिच्या भावाला अटक केली. कुदरतच्या हातावर असलेल्या कपिल नावाच्या टॅटूमुळे पोलिसांना तिच्यावरचा संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखवतात कुदरतने भावाबरोबर मिळून कपिलची हत्या केल्यीच कबुली दिली. कपिल आपला झाला नाही तर कोणाचाच होऊ देणार नाही या इर्षेने तीने त्याचा खून केल्याचं पोलिसांना सांगितलं.