Crime News : धक्कादायक! मुलींच्या Toilets मध्ये छुपा कॅमेरा, 1200 अर्धनग्न व्हिडीओंमुळे खळबळ

Bengaluru Crime News: संतापजनक घटना समोर आली आहे. मुलींच्या वसतीगृहातील टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा लावून 1200 अर्धनग्न व्हिडिओ काढण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.   

Updated: Nov 24, 2022, 01:19 PM IST
Crime News : धक्कादायक! मुलींच्या Toilets मध्ये छुपा कॅमेरा, 1200 अर्धनग्न व्हिडीओंमुळे खळबळ title=
semi nude videos of girls toilet karnataka Bengaluru Crime News nmp

Bengaluru Crime News​ : संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली. चंदीगडनंतर (Chandigarh) आता कर्नाटकमध्ये (Karnataka) मुलींच्या वसतीगृहातील टॉयलेटमध्ये (Toilets) छुपा कॅमेरा (Camera) लावून 1200 अर्धनग्न व्हिडिओ (semi nude videos) काढण्यात आले आहे. या घटनेनंतर देशात एकच खळबळ माजली आहे. भयानक म्हणजे त्या नराधमाला अश्लील व्हिडिओ पाहण्याचं व्यसन लागलं होतं. त्यामुळे या विकृतीतून त्याने थेट मुलींच्या वसतीगृहातील टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला. 

अशी घटना उघडकीस आली

एकेदिवशी हा विकृत विद्यार्थी लपतछपत मुलीच्या वसतीगृहात गेला आणि तिथल्या मुलींच्या टॉयलेटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तो मुलींचे अश्लील व्हिडीओ काढण्यासाठी तिथे कॅमेरा लावत होता. तेवढ्यात तिथे काही मुली आल्यात आणि त्यांनी या नराधमाला रंगेहात पकडलं. (semi nude videos of girls toilet karnataka Bengaluru Crime News) 

हेही वाचा - हिंदू अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत मुस्लिम तरुणाकडून इस्लाम स्वीकारण्याची बळजबरी

पहिलीच घटना नाही

या विकृत मुलाला पडकण्याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही त्याला कॉलेज व्यवस्थापनाने पकडलं होतं. त्यावेळी त्याने माफी मागून आपण परत असं करणार नाही, असा शब्द दिला होता. विकृती ती जाणार कशी आणि त्याने पुन्हा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्याला कॉलेज व्यवस्थापकाने पोलिसांच्या ताब्यात दिलं. 

ही घटना कर्नाटकच्या बंगळुरूतील होसाकेरेहल्ली परिसरातील एका खासगी महाविद्यालयातील आहे. तर आरोपीचं नाव शुभम असून तो मुळचा बिहारचा आहे.