Coronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम, सरकारकडून पुन्हा हा इशारा

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तर तिसऱ्या लाटेचं संकेत सरकार आणि आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आले आहेत.

Updated: Jul 3, 2021, 08:14 AM IST
Coronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम, सरकारकडून पुन्हा हा इशारा title=

मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तर तिसऱ्या लाटेचं संकेत सरकार आणि आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आले आहेत. देशात कोराना व्हायरसची दुसरी लाट पूर्णपणे संपली नसताना लसीकरणावर भर देणे आणि नियम-निर्बंध पाळणे आवश्यक असल्याचा सल्ला राज्यांना दिला. महामारीच्या परिस्थितीबद्दल एका अधिकाऱ्याने सांगितले की लोकांनी स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. 

दुसरी लाट अजूनही कायम आहे... असा इशारा केंद्र सरकारने राज्यांना दिला आहे. छोट्या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव सुरूच आहे. देशात अजूनही 71 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर 10 टक्क्यांहून अधिक आहे. केरळ, छत्तीसगड, अरूणाचल प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा आणि मणीपूर या सहा राज्यांमध्ये रूग्णसंख्या परत वाढायला लागली आहे. 

त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेचा सल्ला दिला आहे. लसीकरण भर आणि नियम, निर्बंध पाळण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना दिला आहे. 21 जूनपासून देशात दररोज सरासरी 50 लाख लोकांना लस दिली जात असल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे कोरोनाची लाट थोपवण्यसाठी निर्बंधांचं पालणं करणं अत्यंत गरजेचं आहे. असं वारंवार सांगण्यात येत आहे. 

गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात दररोज 9 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत होते. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेकडून चिंता व्यक्त केली जात होती. दरम्यान आज (2 जुलै) कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेसाठी काही प्रमाणात दिलासादायक बातमी आहे. 

कोरोनामुळे दिवसभरात 156 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये  8 हजार 753  नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज एकूण 8 हजार 385 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.