SEBI On Adani Group : अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहावर (hindenburg report on adani) फसवणुकीचा गंभीर आरोप करण्यात आलाय. तेव्हापासून अदानी समूहाच्या (Adani Group) कंपन्यांच्या शेअर्समध्ये (Share Market) मोठी घसरण झाली आहे. यासोबतच अदानी ग्रुपचे शेअर्स घसरल्याचं पहायला मिळतंय. याशिवाय अदानी ग्रुपने आपल्या कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा (Adani Enterprises) एफपीओ (FPO) रद्द केला. त्यानंतर बाजारात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता गौतम अदानी (Gautam Adani) यांना जोर का झटका बसलाय. (SEBI On Adani Group unusual price movement in stocks Will action be taken against Gautam Adani latest Marathi news)
अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ रद्द केल्यानंतर गुंतवणुकदाराचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आता आरबीआयने (RBI) या प्रकरणात लक्ष घातलंय. अदानींना कोणकोणत्या बँकेने पैसे दिलेत? याचा अहवाल आरबीआयने मागितला आहे. त्यामुळे अदानींना मोठा दणका बसलाय. त्यानंतर आता सेबी (SEBI) म्हणजेच Securities and Exchange Board of India ने मोठं वक्तव्य केलंय.
सिक्युरिटीज ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ही भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. बाजारात निष्पक्षता ठेवणे, बाजार कार्यक्षमता आणि मजबूत मूलभूत तत्त्वे राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहे, असं सेबीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. ज्यावेळी प्रकरण सेबीच्या नजरेत येतं. त्यावेळी सेबी त्याची तपासणी करते. त्यामुळे योग्य ती कारवाई होते, असं सुचक वक्तव्य सेबीकडून करण्यात आलं आहे.
आणखी वाचा - Adani Group: अदानींना धक्क्यावर धक्के, RBI अॅक्शन मोडवर, बँकांना दिल्या 'या' सुचना!
दरम्यान, गेल्या सात दिवसांतच अदानी समूहाच्या शेअर्समध्ये (Adani Group Share Prize) मोठी उलथापालथ झाल्याची माहिती आहे. आरबीआय (RBI) संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे, त्यामुळे बाजारात आर्थिक स्थर्य (Financial stability) राखण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही सेबीने म्हटलं आहे. त्यामुळे आता प्रकरणात घोळ असल्यास गौतम अदानी यांच्यावर कारवाई होणार का?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.