SBI मधून आपल्याला हव्या त्या राज्यात काम करण्याची संधी. 5 हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु

अर्ज करण्यापूर्वी आपल्याला कोणत्या राज्यासाठी अर्ज करायचा आहे याची खात्री करुन घ्यावी.

Updated: May 16, 2021, 10:59 PM IST
SBI मधून आपल्याला हव्या त्या राज्यात काम करण्याची संधी. 5 हजारांपेक्षा जास्त पदांवर भर्ती सुरु title=

मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) कारकुनी संवर्गात ज्युनियर असोसिएटच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केली आहे. एकूण 5 हजार 237 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर भेट देऊन त्वरित अर्ज करा.

जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार उमेदवार केवळ एका राज्यासाठीच अर्ज करू शकतो. म्हणूनच, त्यांना अर्ज करण्यापूर्वी आपल्याला कोणत्या राज्यासाठी अर्ज करायचा आहे याची खात्री करुन घ्यावी. तसेच त्या राज्यातील स्थानिक भाषा (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) माहित असणे आवश्यक आहे.

एसबीआय भरतीसाठी महत्वाची तारीख (Important date for SBI recruitment)

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी प्रारंभ तारीख - 27 एप्रिल 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 17 मे 2021
पूर्व परीक्षेचे ट्रेनिंग कॉल लेटर - 26 मे 2021
पूर्व परीक्षेची तारीख - जून 2021
मुख्य परीक्षा - 31 जुलै 2021

योग्यता (Qualifactions for SBI Clerk)

एसबीआय लिपीक भरती 2021 साठी, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी घेतलेले उमेदवार त्यासाठी अर्ज करू शकतात. याशिवाय जे उमेदवार शेवटच्या वर्षात आहे ते देखील यासाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा (Age limit)

अर्जासाठी उमेदवारांचे वय 20 वर्षे ते 28 वर्षे असावे. तसेच, उमेदवारांचा जन्म 2 एप्रिल 1993 पूर्वी  आणि 1 एप्रिल 2001 नंतर झालेला नसावा.

एसबीआय भरतीसाठी फी (Fees for SBI recruitment)

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागतील. तर अनुसूचित जाती / जमाती / ओबीसी / पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी आकारली जाणार नाही.