'सॅटेलाईट फोटोमधून चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचं दिसतंय'

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (एलएसी) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांना लक्ष्य केलं आहे. 

Updated: Jun 22, 2020, 10:50 AM IST
'सॅटेलाईट फोटोमधून चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचं दिसतंय' title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : भारत-चीन संघर्ष टोकाला गेला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (एलएसी) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांना लक्ष्य केलं आहे. सॅटेलाईट फोटोमधून चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचं दिसत आहे, असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

कोणीही आपल्या हद्दीत घुसखोरी, कब्जा केलेला नाही, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं असल्याचं राहुल गांधी म्हणाले. परंतु सॅटेलाईट फोटो, ईमेजमध्ये पांगोंग तलावाजवळील, भारत माता या पवित्र भूमीवर चीनने कब्जा केल्याचं स्पष्ट दिसत असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितंल. हिंदी वृत्तवाहिनेने दाखविलेल्या व्हिडिओद्वारे राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. 

'दिशाभूल करणारा प्रचार हा कूटनीति आणि खंबीर नेतृत्त्वाला पर्याय ठरु शकत नाही'

पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत चीनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली नाही असं सांगितल्यानंतर, चीनच्या आक्रमणावर पंतप्रधानांनी शरणागती पत्करली आहे, अशी टीका करत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. 'पंतप्रधानांनी चीनच्या आक्रमणापुढे शरणागती पत्करली आणि भारताचा भूभाग चीनला देऊन टाकला. तो भूभाग चीनचा होता, मग आपले जवान शहीद का झाले? जवान नेमके कुठे शहीद झाले?; असे प्रश्न राहुल गांधींनी विचारले होते.

भारत-चीनदरम्यान झालेल्या हिंसक झडपेनंतर दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत.  

मोठी बातमी : 'त्या' संघर्षानंतर भारतील लष्कराला चीन सीमेवर गोळीबाराची मुभा