12 वी पास असणाऱ्यांना बँकेत काम करणाऱ्याची सुवर्णसंधी, पाहा कसा करायचा अर्ज

तुम्हीही शोधताय का बँकेत नोकरी? मग उशीर करू नका लगेच इथे करा अर्ज

Updated: Jul 10, 2022, 03:58 PM IST
12 वी पास असणाऱ्यांना बँकेत काम करणाऱ्याची सुवर्णसंधी, पाहा कसा करायचा अर्ज title=

मुंबई: (IBPS) ने लिपिक पदाच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवारांना सुवर्ण संधी दिली आहे. 12 वी उत्तीर्ण उमेदवार बँक क्लर्कच्या पदासाठी नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.ऑनलाइन अर्ज 1 जुलै 2022 पासून सुरू झाले आहेत. 

जर तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर तुम्ही 21 जुलैपूर्वी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, जेथे सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागेल. 

त्याच वेळी, एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना ऑनलाइन अर्जासाठी 175 रुपये शुल्क भरावे लागेल. बँकेत नोकरीसाठी पात्रता पदवी आहे. तर उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे.

ऑनालाईन अर्ज करण्याची तारीख 1 जुलैपासून 2022 पासून सुरू झाले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै असणार आहे. सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांना ऑनलाइन अर्जासाठी 850 रुपये भरावे लागतील. याशिवाय SC/ST/दिव्यांग उमेदवारांना ऑनलाइन अर्जासाठी 175 रुपये भरावे लागतील.

उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असायला हवं अशी अट आहे. IBPS लिपिक भरती नियमांनुसार वयात सवलत देण्यात आली आहे. 6035 रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. 

बँकेत लिपिक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.