दिल्ली पोलिसांना बॉर्डरवर पाठवा, चीनच्या सीमेसारखी परिस्थिती तयार केली - संजय राऊत

दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केलेत. त्याला शेतकऱ्यांना तीव्र विरोध केला आहे. हे कायदे मागे घेण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Updated: Feb 2, 2021, 04:51 PM IST
दिल्ली पोलिसांना बॉर्डरवर पाठवा, चीनच्या सीमेसारखी परिस्थिती तयार केली - संजय राऊत  title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केलेत. त्याला शेतकऱ्यांना तीव्र विरोध केला आहे. हे कायदे मागे घेण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, शिवसेनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आज शिवसेनेच्या शिष्टमंडळांने भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.((Sanjay Raut slams centre) देशात काय चालले आहे, असे सांगत दिल्ली पोलिसांना बॉर्डरवर पाठवा. चीनच्या सीमेसारखी परिस्थिती दिल्लीच्या सीमेवर तयार केली, अशी टीका संजय राऊत यांनी केली. (Sanjay Raut slams centre; says aggression should have been used against Chinese forces not our farmers)

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यायाला शिवसेनेचे शिष्टमंडळ गाझीपूर बॉर्डरवर गेले आहे. शिवसेना खासदार संजय राऊतांसह, अनिल देसाई आणि विनायक राऊत, अरविंद सावंत या चौघांचे शिष्टमंडळ आंदोलकांना भेटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचना केल्यानंतर शिवसेनेचे शिष्टमंडळ गाझीपूर बॉर्डरवर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली. याबद्दल राऊतांना विचारलं असता पंतप्रधान नरेंद्र मोदी जर पाकिस्तानात जाऊन पाकचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना भेटू शकतात तर आम्ही आपल्याच देशातल्या शेतकरी नेत्यांना का भेटू नये, असा सवाल केला. तसेच शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही आंदोलनाबाबत सेनेची भूमिका स्पष्ट केली.

महाविकास आघाडीने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले.   मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या  संकट काळात त्यांच्या पाठिशी ठाम ऊभे राहीले. शेतकऱ्यांची तडफड आणि अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून आज सिंघू सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत आहे, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, केंद्र सरकाच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यात शेतकऱी संघटनांकडून आज एक आणखी मोठा निर्णय घेण्यात आलाय. 6 फेब्रुवारीला शेतकरी संघटनांकडून देशव्यापी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी याची घोषणा केलीय. 6 तारखेला दुपारी 12 ते 3 या वेळेत सर्व रस्ते अडवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत विशेष घोषणा न करण्यात आल्यानं शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केलीय. सध्या सिंघू, गाझीपुरसह दिल्लीच्या सर्व सीमांवर हजारोंच्या संख्येने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.