धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर ५ महिने १७ जणांनी केला बलात्कार

नात्याला काळीमा फासणारी घटना 

Updated: Feb 2, 2021, 03:38 PM IST
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर ५ महिने १७ जणांनी केला बलात्कार  title=

मुंबई : १५ वर्षीय मुलीवर सलग ५ महिने १७ जणांकडून बलात्कार (trafficking of minor girl for over 5 months) झाल्याची धक्कादायक घटना कर्नाटकच्या चिक्कमंगळुरमध्ये (Karnataka Chikkamagaluru)घडली आहे. या घटनेमुळे माणुसकीला काळीमा फासली गेली आहे. या प्रकरणात पीडित मुलीवर गेल्या पाच महिन्यांपासून बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि तस्करी केल्याप्रकरणात ८ जणांना अटक करण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींमध्ये मुलीच्या मावशीचाही समावेश आहे. 

'आई मरो पण मावशी जगो', अशी म्हण प्रचलित आहे. पण मावशी-भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना कर्नाटकात घडली आहे. या घटनेची पहिली तक्रार जिल्हा बालकल्याण समिती सभापतींनी ३० जानेवारी रोजी श्रीनगेरी पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली. 

अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्रीती यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय मुलीवर १७ जणांनी गेल्या पाच महिन्यात बलात्कार केला आहे. यामध्ये या तरूणीच्या मावशीचा मुख्य समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दगड फोडणाऱ्या युनिटमध्ये काम करत असताना गिरीश नावाच्या बसचालकासोबत ओळख झाली होती. त्याने तिच्यावर बलात्कार करून लैगिंक अत्याचार केले. 

 त्यानंतर गिरीशने पीडित तरूणीचा नंबर अभिला दिला. त्याने त्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि तिचे फोटो, व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केलं. त्यानंतर त्याच्या इतर मित्रांनी पीडित तरूणीवर अत्याचार केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आपल्या आईच्या निधनानंतर गेल्या तीन वर्षांपासून मावशीसोबत राहत होती. या मावशीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात छोटी अभी, गिरीश, विकास, माणिकांता, संपथ, अश्वथ गोवडा, राजेश, अमिथ, संतोष, दीक्षित. संतोष, निरंजन, नारायण गोवडा, अभि गोवडा, योगेश, पीडितेची मावशी आणि एमजीआर क्रशर मालक यांना तरूणीने ओळखलं आहे.