अडसूळांना हटवलं नाही, संजय राऊत यांचं स्पष्टीकरण

समन्वयाच्या दृष्टीने अशी रचना पक्षात करावी लागत असल्याचं राऊत यांनी म्हटलंय

Updated: Sep 18, 2018, 11:04 AM IST
अडसूळांना हटवलं नाही, संजय राऊत यांचं स्पष्टीकरण title=

नवी दिल्ली : शिवसेना नेते खासदार संजय राऊत संसदेत पक्षाच्या दोन्ही सभागृहाची संसदीय नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. मात्र लोकसभा गटनेतेपदी आनंदराव अडसूळ हेच असतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतलाय. लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींना पत्र सादर करून बदलाची सूचना देण्यात आली आहे. संसदेत शिवसेनेचे एकूण 21 खासदार. लोकसभेत 18 आणि राज्यसभेत 3 खासदार आहेत. याआधी संजय राऊत होते राज्यसभेत पक्षाचे गटनेते होते. समन्वयाच्या दृष्टीने अशी रचना पक्षात करावी लागत असल्याचं राऊत यांनी म्हटलंय.  

अधिक वाचा :- अडसूळांची गटनेते पदावरून उचलबांगडी, राऊतांना लॉटरी

 


 

'अविश्वास' ठरावाचा घोळ

अविश्वास ठरावावेळी झालेला व्हीपचा घोळानंतर पक्षात समन्वय साधण्यासाठी काही बदल गरजेचे होते. अविश्वास ठरावावेळी पक्षानं काढलेला सरकारला समर्थन करण्याचा व्हीप व्हायरल झाला होता. मात्र, प्रत्यक्षात शिवसेनेनं टाकला कामकाजावर बहिष्कार घातला होता. व्हीपच्या या घोळामुळे पक्षाची नाचक्की झाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षात चांगल्या समन्वयासाठी उद्धव ठाकरे यांची सावध खेळी असल्याचं मानलं जातंय.