'हम बुरे ही ठीक हैं' म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवाब मलिकांचं प्रत्यूत्तर

शिवसेना - राष्ट्रवादीच्या मैत्रीचा नवा अध्याय...

Updated: Nov 21, 2019, 11:46 AM IST
'हम बुरे ही ठीक हैं' म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवाब मलिकांचं प्रत्यूत्तर title=

नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या आणि नव्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत दररोज शेरोशायरीच्या माध्यमातूनही व्यक्त होताना दिसत आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं संजय राऊत सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत. 'अगर जिंदगी में कुछ पाना हो तो तरीके बदलो इरादे नही' असं ट्विट राऊत यांनी मंगळवारी केलं होतं. त्यानंतर आज ते म्हणतायत 'हम बुरे ही ठीक हैं, जब अच्छे थे तब कौनसा मेडल मिल गया था'...  

राऊतांच्या या शेरोशायरीला राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी प्रत्यूत्तर दिलंय... तेही शायरीतूनच...

'राहों की ज़हमतों का तुम्हे क्या सुबूत दूं,

मंज़िल मिली तो पाओं में छाले नही रहे।'

असं नवाब मलिक यांनी ट्विट केलंय. त्यामुळे, शिवसेना-राष्ट्रवादीच्या नव्या मैत्रीचा आरंभच यातून दिसून येतोय. 


शिवसेना - राष्ट्रवादीच्या मैत्रीचा नवा अध्याय...

यापूर्वीही, 'तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था... उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था - हबीब जालिब' असं ट्विटरवर म्हणणाऱ्या संजय राऊत यांना मलिक यांनी प्रत्यूत्तर दिलं होतं. 'जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे, किराएदार हैं ज़ाती मकान थोड़ी है : राहत इंदौरी' असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांना प्रतिसाद दिला होता. 

 


शिवसेना - राष्ट्रवादीच्या मैत्रीचा नवा अध्याय...

दुसरीकडे, काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटद्वारे त्यांनी ही नाराजी व्यक्त केलीय. 'काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात बीएसपीसोबत आघाडी करत काँग्रेसनं चूक केली होती. तेव्हापासून आजपर्यंत उभं राहणंही कठिण जातंय. महाराष्ट्रात याच चुकीची पुनरावृत्ती होतेय. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनून काँग्रेस स्वत:साठीच खड्डा खोदत आहे. काँग्रेसनं दबावाखाली येऊ नये' असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.


शिवसेना - राष्ट्रवादीच्या मैत्रीचा नवा अध्याय...

दरम्यान, 'महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल', असा पुनरुच्चार केलाय. आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांना काँग्रेसनं समोर ठेवलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या अटीबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारले. यावेळी, 'देशाची राज्यघटनाच धर्मनिरपेक्ष या शब्दावर आधारलेली आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेबाबत आम्हाला कुणी शिवकण्याची गरज नाही' असं प्रत्यूत्तर संजय राऊत यांनी दिलंय.