लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (UP Assembly Election 2022) काही महिन्यांवर आली आहे. सगळेच पक्ष आतापासून कामाला लागले आहे. या दरम्यान टीका आणि आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहेत. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत. पण अशीच एक घोषणा समाजवादी पक्षावर टीकेचं कारण बनली आहे. ज्यामुळे त्यांना ट्रोल केलं जात आहे.
समाजवादी पार्टी (Samajwadi Party) ने अशी एक घोषणा केली. ज्यामुळे त्यांना ट्रोल केलं जातंय. समाजवादी पक्षाने (SP) ट्विट करत सायकल वरुन प्रवास करताना अपघात झाला तर 5 लाखांची मदत दिली जाईल अशी घोषणा केली.'
— Samajwadi Party (@samajwadiparty) December 28, 2021
सोशल मीडियावर ट्रोल
समाजवादी पक्षाची ही घोषणा सोशल मीडियावर आता ट्रोल होऊ लागली आहे. लोकं या घोषणेवरुन पक्षावर टीका करु लागले आहेत. एका यूजरने म्हटलं की, '5 लाख रुपयांसाठी अनेक लोकं आपल्या आजोबा किंवा दुसऱ्या वृद्ध व्यक्तींना मारु शकतात.'
दुसऱ्या एका यूजरने म्हटलं की, 'अरे भाऊ, असं काही करा ज्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढेल. सायकलने कोणी जावू नका...'
अखिलेश यादव विधानसभा निवडणुकीसाठी दररोज रॅली आणि सभा घेत आहेत. लोकांकडे ते संधी मागत आहेत. भाजप आणि योगी सरकारवर टीका करण्याची कोणतीही संधी ते सोडत नाहीयेत.
दुसरीकडे भाजपकडून पीएम नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि सीएम योगी आदित्यनाथ देखील उत्तर प्रदेशात अनेक केलेल्या कामांचे उदघाटन करत आहेत.
कानपूरमध्ये मंगळवारी जनसभेला संबोधित करताना पीएम नरेंद्र मोदी यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीकास्त्र सो़डलं. 'काही दिवसांपूर्वी भरभरुन नोटा मिळाल्या. जगाला माहित आहे या भ्रष्ट कामामागे कोणाचा हात आहे. त्यांनीच 2017 च्या आधी भ्रष्टाचाराचं हे सत्र संपूर्ण यूपीमध्ये पसरवलं आहे. आता भाजप सरकार ही घाण साफ करत आहे. हेच यूपीचं सत्य आहे आणि जनता हे समजत आहे.'