'शिवभक्तांनी मुस्लिम कारागिरांकडून वस्तू खरेदी करु नका'

बागपत जिल्ह्याच्या दाह गावातील कावड शिबीराच्या उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या.

Updated: Jul 25, 2019, 11:32 AM IST
'शिवभक्तांनी मुस्लिम कारागिरांकडून वस्तू खरेदी करु नका' title=

बागपत :  मुस्लिम कारागिरांच्या हातून बनलेली राखी किंवा कावड खरेदी करुन नका असा अजब सल्ला साध्वी प्राची यांनी दिला आहे. बागपत जिल्ह्याच्या दाह गावातील कावड शिबीराच्या उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या. असे वक्तव्य करुन त्यांनी  उत्तर प्रदेशच्या कैराना येथील समाजवादी पार्टीच्या आमदार नाहिद हसन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.  भाजप कार्यकर्त्यांच्या दुकानातून सामान खरेदी करु नका असे वक्तव्य नाहिद हसन यांनी केले होते. 

हिंदू शिवभक्तांनी मुस्लिमांद्वारे बनवल्या गेलेल्या कावडी आणि इतर वस्तू खरेदी करु नयेत, त्यांच्यावर बहिष्कार घालावा असे साध्वी प्राची यांनी म्हटले. यामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून आलला आहे. शिक्षणाचे मंदीर म्हटल्या जाणाऱ्या मशिद आणि मदरशांमध्ये दहशतवाद्यांची फौज तयार होतेय. याच मदरशांमध्ये हाफिज सईद सारखे दहशतवादी तयार होत असल्याचे त्यांनी म्हटले.

हिंदुना रोजगार 

हरिद्वारमधील कावड यात्रेमध्ये साधारण ९९ टक्के मुस्लिम कारागिर कावड तयार करत आहेत. यांच्यावर बहिष्कार टाकून हिंदुंनी स्वत: कावड तयार करायला हव्यात. यामुळे हिंदुना रोजगार मिळू शकेल असे साध्वी प्राची म्हणाल्या. पंतप्रधान मोदी हे सबका साथ आणि सबका विकासाचे नारे देत आहेत. पण काहीजण हा नारा फ्लॉप करण्याचे कारस्थान आखत आहेत. जय श्रीराम घोषणेचे खोटे व्हिडीओ बनवून बदनाम केले जात असल्याचे त्या म्हणाल्या.