शबरीमलामध्ये महिलांना प्रवेश नाहीच, आज केरळ बंद

 बंदच्या आवाहनानंतर राज्यात जागोजागी पोलीस दल तैनात करण्यात आलं

Updated: Oct 18, 2018, 10:37 AM IST
शबरीमलामध्ये महिलांना प्रवेश नाहीच, आज केरळ बंद title=

नवी दिल्ली : केरळच्या प्रख्यात शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतरही बुधवारी महिलांना या मंदिरात प्रवेश मिळू शकला नाही. बुधवारी मंदिराचे दरवाजे उघडण्यापूर्वी आणि उघडल्यानंतर मोठा वाद झाला... काही ठिकाणी मारहाण आणि हिंसक आंदोलनही झालं... सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही महिलांना प्रवेश न मिळू शकल्यानं आज केरळ बंदचं आवाहन करण्यात आलंय. बंदच्या आवाहनानंतर राज्यात जागोजागी पोलीस दल तैनात करण्यात आलंय. 

बुधवारनंतर गुरुवारीही मंदिरात महिलांचे प्रवेश मिळवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. उल्लेखनीय म्हणजे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता मंदिराचे दरवाजे उघडले तेव्हा सर्वांच्या नजरा या ठिकाणी लागल्या होत्या.