डॉलरच्या तूलनेत रूपयाची घसरण सुरूच... जाणून घ्या 'असा' होणार तूमच्या खिश्यावर परिणाम!

डॉलर हा वेगाने घसरायला लागलाच होता त्यातून तो आता 74 वरून 80 वर गेला आहे. 

Updated: Jul 21, 2022, 01:08 PM IST
डॉलरच्या तूलनेत रूपयाची घसरण सुरूच... जाणून घ्या 'असा' होणार तूमच्या खिश्यावर परिणाम! title=

Dollar vs Rupees: रूपयाची घसरण गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळते आहे त्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर तर ही घसरण फार मोठी मानली जाते आहे त्यातून आता या घसरणीचा काय तोटा होईल आणि त्यातून सामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार आहे याचा विचार करणेही तितकेच आवश्यक झाले आहे.

यावर्षीपासूनच डॉलर हा वेगाने घसरायला लागलाच होता त्यातून तो आता 74 वरून 80 वर गेला आहे. 

अमेरिकी चलन Dollar च्या तुलनेत भारतीय चलन म्हणजे रूपया प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. दोन दिवसांपासून ही घसरण पाहायला मिळाली होती. जेव्हा मंगळवारचा दिवस आला आणि बाजार सुरू झाला तेव्हापासूनच ही घसरण पाहायला मिळाली होती. त्यातून कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या. याच दिवशी हा रूपया अमेरिकन Dollar च्या तुलनेत 80.05 रुपये per Dollar इतका झाला. 

जाणून घ्या डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला तर त्याचा भारतीय नागरिकावर काय परिणाम होतो.

इम्पोर्टेड वस्तू महाग
परदेशातून येणाऱ्या वस्तुंची आयात महाग होणार आहे. आधीपेक्षा जास्त पैसे द्यावे आपल्याला द्यावे लागणार आहेत. परदेशातून आयात केलेल्या वस्तूची किंमत जर एक डॉलर असेल तर त्यासाठी जानेवारी महिन्यात 74 रुपये मोजावे लागत होते आता त्यासाठी 80 रुपये मोजावे लागतील. 

इंधन दरात वाढ
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला तर भारताला परदेशातून आयात केलेले इंधन अधिक महाग खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे देशांतर्गत विक्री आणि बाजारपेठेवर त्याचा परिणाम होऊन महागाई वाढणार आहे. यामुळे घरगुती वस्तूंपासून पेट्रोल, डिझेल महाग होणार आहे. 

फॉरेन टूरही होणार महाग
या वर्षीच्या सुरूवातीला जर तूम्ही एखाद्या देशात फिरायला गेला होतात तर त्याचा खर्च पहिल्या क्वारटरमध्ये कमी होतो जो आता जास्त होणार आहे. खासकरून कोवीडच्या महामारीमुळे लोकं फारसे घराबाहेर पडले नव्हते त्यामुळे लोकं जास्त फिरायला लागले होते पण आता रूपया घसरल्याने टूरही फार महाग झाली आहे. 

परदेशी शिक्षणही होणार महाग
आजकाल तरूण मुलमुली हे परदेशी शिक्षण घेतात आणि त्यासाठी करोडो रूपये मोजतात. आता त्यांचा त्याहून जास्त रूपये डॉलरच्या तुलनेत द्यावे लागणार आहेत.