इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे ट्रान्सफर करण्याचे पर्याय आणि किती असते लिमिट? जाणून घ्या

तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. तुम्ही कोणत्या पर्यायाद्वारे पैसे हस्तांतरित करता, त्याची मर्यादा किती? जाणून घ्या

Updated: Jul 21, 2022, 12:56 PM IST
इंटरनेट बँकिंगद्वारे  पैसे ट्रान्सफर करण्याचे पर्याय आणि किती असते लिमिट? जाणून घ्या  title=

IMPS vs RTGS vs NEFT: सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळात बँकिंग खूपच सुलभ झाली आहे. डिजिटल माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करण्याचं प्रमाण वाढलं आहे. तुम्ही देखील इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे ट्रान्सफर केले असतील. यामध्ये IMPS, RTGS आणि NEFT हे तीन पर्याय आहेत.  जर तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. तुम्ही कोणत्या पर्यायाद्वारे पैसे हस्तांतरित करता, त्याची मर्यादा किती? कोणत्या मोडमध्ये तुम्हाला शुल्क भरावे लागते, याबाबत माहिती जाणू असेल तर तुम्हाला सोपे होईल.

आयएमपीएस

आयएमपीएस (IMPS) म्हणजे इमीडिएट पेमेंट सर्व्हिस. हा पैसे हस्तांतरित करण्याचा पर्याय 24 तास उपलब्ध असतो. ही सेवा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे ऑफर केली जाते. हे ग्राहकांना संपूर्ण भारतातील बँका आणि आरबीआयद्वारे अधिकृत प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट इश्युअर्स (PPIs) द्वारे त्वरित पैसे हस्तांतरित करण्यास सक्षम करते. IMPS द्वारे निधी हस्तांतरित करण्याची मर्यादा 5 लाख रुपये आहे. याच्या मदतीने तुम्ही इंटरनेट बँकिंगच्या सुविधेचा वापर करून कोणालाही त्वरित पैसे हस्तांतरित करू शकता. बँका तुमच्याकडून या सेवेसाठी शुल्क देखील घेऊ शकतात.

आरटीजीएस

आरटीजीएस म्हणजेच रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट ही पैसे हस्तांतरीत करणारी सुविधा आहे. इंटरनेट बँकिंगद्वारे आरटीजीएस सेवा देखील नेहमी उपलब्ध असते. आरटीजीएस मुख्यत्वे मोठ्या फंड कॉल ट्रान्सफर किंवा व्यवहारांशी संबंधित आहे. तुम्ही आरटीजीएसद्वारे किमान 2 लाख रुपये पाठवू शकता आणि कमाल मर्यादा नाही. आरटीजीएस ऑनलाइन करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. तुम्ही आरटीजीएसद्वारे पैसे हस्तांतरित केल्याचा तपशील आरबीआयच्या बुकमध्ये नोंदवला जातो. ऑनलाइन पैसे आरटीजीएस करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. होय, जर तुम्ही शाखेत जाऊन आरटीजीएस केले तर बँका तुमच्याकडून शुल्क आकारू शकतात.

एनईएफटी

एनईएफटी म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ही भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या मालकीची आणि ऑपरेट केलेली राष्ट्रीय केंद्रीकृत पेमेंट प्रणाली आहे. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत आणि एका बँकेच्या शाखेतून दुसऱ्या बँकेच्या शाखेत एनईएफटीद्वारे पैसे हस्तांतरित केले जातात. या मोडद्वारे 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ऑनलाइन हस्तांतरित केली जाऊ शकते. इंटरनेट बँकिंग वापरकर्ते याद्वारे  पैसे हस्तांतरित करू शकतात. बचत खातेधारकांसाठी ऑनलाइन एनईएफटीसाठी कोणतेही शुल्क नाही. तुम्ही शाखेत जाऊन तुमच्या खात्यातून एनईएफटीद्वारे दुसऱ्याच्या खात्यात पैसे पाठवू शकता. यासाठी बँका तुमच्याकडून शुल्कही आकारू शकतात.