सरदार पटेलांचा पुतळा बनू शकतो मग राम मंदिर का नाही ? - संघ

'हिंदूंच्या संयमाची परीक्षा घेऊ नका आवश्यक ते सारं काही करा, पण अयोध्येत भव्य राममंदिराचा मार्ग प्रशस्त करा'

Updated: Dec 3, 2018, 11:07 AM IST
सरदार पटेलांचा पुतळा बनू शकतो मग राम मंदिर का नाही ? - संघ  title=

मुंबई : 'नर्मदा सरोवरात लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा बनू शकतो. तर शरयूच्या तीरी भव्य राममंदिर का बनू शकत नाही ?,' असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळेंनी सरकारला विचारलाय. मुंबईत विश्व हिंदू सभेनं आयोजित केलेल्या हुंकांर सभेत होसबळे बोलत होते. 'लवकरात लवकर राममंदिर बनवा, हिंदूंच्या संयमाची परीक्षा घेऊ नका आवश्यक ते सारं काही करा, पण अयोध्येत भव्य राममंदिराचा मार्ग प्रशस्त करा', असं यावेळी होसबळेंनी दिला.

अध्यादेश काढा- भागवत 

'देश हा फक्त कायद्याने नव्हे तर नागरिकांच्या भावनांवर चालतो. त्यामुळे राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने निवडणुकीपूर्वी अध्यादेश काढावा', अशी मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

ते रविवारी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या हुंकार रॅलीत बोलत होते.

संपूर्ण मंदिर- शाह 

'आपण राम मंदिरसाठी फक्त एक वीटच नाही ठेवू इच्छीत, तर संपूर्ण मंदिर बनवू इच्छितो', असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

अयोध्येत मंदिर बांधण्यावर अध्यादेश आणण्याशी संबंधित मुद्यावर, सुधीर चौधरी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलंय.