कनौज : भुकेल्या शेळीनं मालकाचे ६२ हजार रुपये खाल्ल्याचा प्रकार उत्तर प्रदेशच्या कनौजमध्ये घडला आहे. सर्वेश कुमार पँटच्या खिशामध्ये ६२ हजार रुपये होते. ही पँट बाहेर ठेवून सर्वेश कुमार अंघोळीला गेले. त्यावेळी शेळीनं ६२ हजार रुपयांच्या नोटा खाल्ल्या.
या पैशांमधून सर्वेश कुमार यांना विटा खरेदी करायच्या होत्या. अंघोळ करून बाहेर आल्यावर शेळीनं दोन हजार रुपयांच्या ३१ नोटा खाल्ल्याचं त्यांच्या लक्षात आलं. सर्वेश कुमार यांच्या खिशामध्ये ६६ हजार रुपयांच्या नोटा होत्या पण यापैकी उरलेल्या दोन नोटाही शेळीनं थोड्या खाल्ल्या होत्या.
Rs 66,000 cash kept in a man's pocket chewed by his goat in Uttar Pradesh's Kannauj; owner says he borrowed the money for building a house pic.twitter.com/V6m96SjiV9
— ANI UP (@ANINewsUP) June 7, 2017