RRB Group D Admit Card | RRB ग्रुप डी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; असे करा डाऊनलोड

RRB Group D Admit Card Dates Out: रेल्वे भरती बोर्ड (RRB)ने ग्रुप डी भरती परीक्षेच्या पहिल्या पहिल्या टप्प्याचे प्रवेश पत्र (Admit Card)जारी केले आहेत. 

Updated: Aug 10, 2022, 08:35 AM IST
RRB Group D Admit Card | RRB ग्रुप डी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; असे करा डाऊनलोड  title=

RRB Group D Admit Card Dates Out: रेल्वे भरती बोर्ड (RRB)ने ग्रुप डी भरती परीक्षेच्या पहिल्या पहिल्या टप्प्याचे प्रवेश पत्र (Admit Card)जारी केले आहेत. आरआरबी ग्रुप डी परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट rrbcdg.gov.inवर लॉग इन करून डाऊनलोड करता येईल.

यावर्षी ग्रुप डी पदासाठी 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत परीक्षा होणार आहे. परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यात घेतली जाईल. RRB ने परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख देखील जाहीर केली आहे. यासह हे देखील लक्षात घ्यावे की बोर्डाने उमेदवारांसाठी CBT मॉक टेस्ट लिंक देखील सक्रिय केली आहे.

परीक्षेच्या चार दिवस आधी RRB ग्रुप डी ई-कॉल लेटर

RRB ने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, परीक्षा केंद्र शहर, परीक्षेची तारीख पाहण्यासाठी आणि SC/ST उमेदवारांसाठी मोफत प्रवासासाठी अधिकृत फॉर्म डाउनलोड करण्याची लिंक 09 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता सर्व RRB च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल. 

परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर उमेदवारांची आधार लिंक्ड बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल. उमेदवारांनी त्यांचे मूळ आधार कार्ड आणणे आवश्यक आहे.

आरआरबी ग्रुप डी परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा

  • RRB गट डी परीक्षेची तारीख आणि वेळ लिंक: ऑगस्ट 09, 2022
  • RRB ग्रुप डी प्रवेशपत्र डाउनलोड लिंक: ऑगस्ट 13, 2022

City Slip 2022 कशी डाऊनलोड करावी?

  • होम पेजवर CEN-01/2019-RRC(पे-लेव्हल-1): संगणक-आधारित-परीक्षा CBT (पहिला टप्पा) पहिल्या CBT फेरीच्या परीक्षा सिटी स्लिपसाठी येथे क्लिक करा.
  • उमेदवार त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स जसे की नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख इत्यादी प्रविष्ट करा.
  • तुमची RRB ग्रुप डी परीक्षा सिटी स्लिप 2022 स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  • RRB ग्रुप डी परीक्षा सिटी स्लिप डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

RRB Group D Exam 2022  एडमिट कार्ड कसे डाऊनलोड करायचे?

13 ऑगस्ट 2022 पासून उमेदवार आरआरबी ग्रुप डी प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. RRB ग्रुप डी हॉल तिकीट डाउनलोड करण्याच्या स्टेप्स .

  • सर्वप्रथम उमेदवार RRB च्या संबंधित प्रादेशिक अधिकृत वेबसाइट भेट द्या जसे की rrbcdg.gov.in .
  • होमपेजवरील लिंक पहा ज्यात लिहिले आहे, RRB CBT-1 परीक्षा हॉल तिकीट किंवा प्रवेशपत्रासाठी येथे क्लिक करा.
  • उमेदवार त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स जसे की नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख इत्यादी प्रविष्ट करा.
  • तुमचे RRB ग्रुप डी परीक्षेचे प्रवेशपत्र 2022 स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  • आरआरबी ग्रुप डी अॅडमिट कार्ड 2022 डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट आउट घ्या.