मुंबई : भारतीय रेल्वे भरती बोर्डतर्फे ग्रुप डीच्या 1 लाखाहून अधिक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. परंतू बोर्डाच्यावतीने परीक्षांच्या तारखा जाहीर केलेल्या नाही. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करून 3 वर्ष झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या तारखा आरआरबी एनटीपीसी सीबीटी-1 चा रिझल्ट जारी केल्यानंतर जाहीर केल्या जाणार आहेत. आरआरबी एनटीपीसी भरतीचा निकाल 10 सप्टेंबर रोजी जारी होऊ शकतो. उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता.
तसेच, एनटीपीसी सीबीटी - 1 रिझल्ट जारी केल्यानंतर एका आठवड्यानंतर बोर्डातर्फे ग्रुप डीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कऱण्यात येतील. अशातच उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. या भरतीसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सर्व उमेदवार सरकारी नोकरीची आशा लावून परीक्षा कधी होतील याची वाट पाहत आहेत.